Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

अवैध वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास खाडीपात्रात उतरून आंदोलन करणार

अवैध वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास खाडीपात्रात उतरून आंदोलन करणार

अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार

वाघवणे येथील ग्रामस्थांचा निवेदनद्वारे तहसील प्रशासनास इशारा

मालवण | प्रतिनिधी : वाघवणे कर्ली खाडी येथे अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. अवैध वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास आम्हा ग्रामस्थांना खाडीपात्रात उतरून वाळु उत्खननाला विरोध करावा लागेल. असा इशारा वाघवणे येथील ग्रामस्थांच्या वतीने मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना निवेदन द्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही वाघवणे येथील रहिवाशी असून कर्ली खाडीत शास‌नाने बांधलेल्या कर्ली पुलानजीक पूर्वेकडे आमची घरे, मांगर भातशेती, माडबागायती आदी स्थावर मिळकती आहेत. सद्‌यस्थितीत वाघवणे येथील रेती उपगट D5 या वाघवणे व आंबेरी या गावांच्या सीमेवर असलेल्या रेती उपगटामध्ये रात्रंदिवस बेसुमार वाळु उत्खनन अनधिकृत रित्या चालू आहे. तसेच रात्रीच्या वेळी कर्ली पुलापासून 300 मीटरवर म्हणजेच प्रतिबंधीत क्षेत्रात जोरदार अवैध वाळू उत्खनन सुरु आहे. कर्ली पुलास धोका निर्माण झाला आहे अशा आशयाचे पत्र काही दिवसांपूर्वी सार्वजनीक बांधकाम विभागाकडून
दिल्याचे वाचनात आले, तरिसुद्धा  बेकायदा वाळू उत्खननावर दुर्लक्ष होत आहे. तरी आपणांस विनंती आहे की या अनधिकृत वाळू उत्खननावर तात्काळ ठोस कारवाई करावी, फक्त रॅम्प उध्वस्त करणे एवढ्याच कारबाईवर न थांबता खाडीपात्रात उभ्या असलेल्या अनधिकृत होड्यांवर देखील कारवाई करावी. कारण आपण उध्वस्त केलेले रॅम्प हे तात्काल दुरुस्त करून पुन्हा बेकायवा वाबु उत्खनन सुरु होते.



बेकायदा वाळू उत्खननामुळे कर्ली पुलास धोका निर्माण झाला आहे, खारबंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे परिणामी आम्हा ग्रामस्थांच्या माड बागायती, भातशेतीच्या जमिनी, पिण्यायोग्य पाणी असलेल्या विहिरी धोक्यात आलेल्या आहेत.

किमान एवढ्या गंभीर बाबींचा विचार करून तरी या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करावी ही विनंती. नाहीतर नाईलाजाने आम्हा ग्रामस्थांना खाडीपात्रात उतरून वाळु उत्खननाला विरोध करावा लागेल, आणि असे करताना काठी अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहिल. असे निवेदनात म्हटले आहे. यां निवेदनावर विरेश मांजरेकर, महेश चव्हाण यांसह अन्य ग्रामस्थ यांच्या स्वाक्षरी आहेत.



तहसीलदार यांचे कारवाईचे आदेश

कर्ली, कालावल खाडी पात्रात अनधिकृत वाळू उतखनन वाहतूक विरोधात यापूर्वी धडक कारवाई करण्यात आली आहे. आता नव्याने आजपासून पथक तैनात केली जातील. बंदर व पोलीस प्रशासन यांनाही संयुक्त कारवाई बाबत पत्र दिले जाईल. तसेच बंदर विभागाकडून अनधिकृत वाळू होड्यांची तपासणी केली जाणार असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी सांगितले.

rapan bottom