Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी…

स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी…

चिवला बीच येथे होणाऱ्या पोहण्याच्या स्पर्धेसंदर्भात शिल्पा खोत यांचे प्रशासनाला निवेदन

 जुबेर खान | मालवण : मालवणमध्ये चिवला बीच येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पोहण्याच्या स्पर्धा (स्विमिंग कॉम्पिटिशन) मध्ये सहभागी होणाऱ्या स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी, असे मागणी निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे व मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे.

मालवणमध्ये चिवला बीच येथे पोहण्याच्या स्पर्धा (स्विमिंग कॉम्पिटिशन) आयोजित केली जाते. चिवला बीच येथील समुद्रकिनाऱ्यावर मुंबईची एक संस्था दरवर्षी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करते. ह्या स्पर्धांसाठी प्रत्येक स्पर्धकाला रु. २०००/- (दोन हजार रुपये) अशी मोठी रक्कम 'फी' म्हणून आकारली जाते. ह्याद्वारे लाखो रुपयांचा नफा कमावला जातो, मात्र स्थानिक मुलांना फीमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जात नाही. स्थानिक मुलांचे पालक शहरवासियांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्यामुळे, केवळ आर्थिक कारणास्तव स्थानिक मुलांना ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत स्थानिक भूमिपुत्रांना १००% फीमध्ये सूट देण्याची अट सदर संस्थेला परवानगी देतांनाच घालण्यात यावी. तसेच गावातील भूमिपुत्रांसाठी हे "कायम स्वरूपी धोरण" ठेवावे व त्यांना फीमध्ये पूर्णतः माफी द्यावी. ह्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख प्रवेश अर्जामध्येच केलेला असावा.आमच्या ह्या विनंतीला मान्यता देऊन, स्थानिक मुलांना ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी असे निवेदनाद्वारे शिल्पा खोत यांनी म्हंटले आहे.

यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक मंदार केणी, महेश जावकर, तपस्वी मयेकर, संमेश परब, अमान, बाबी जोगी शांती तोंडवळकर, मानसी घाडीगावकर, अश्विनी आचरेकर, तन्वी भगत, नंदा सारंग, निखील शिंदे, नरेश हुले आदी उपस्थित होते

rapan bottom