सावंतवाडी : सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सभा पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर, यांनी प्रास्त्विक वाचन करून शुभेच्छा काम करायला सुरुवात केल श्रीराम शिरसाठ यांनी दिलेल्या राजीनाम्या मुळे संघटनेचा प्रभारी अध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी सभा ठेवण्यात आली होती. श्रीराम शिरसाठ यांनी सुचविल्याप्रमाणे सध्या वीज ग्राहक संघटनेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदी कार्यरत असलेले संजय लाड यांचे एकमताने निवड करण्यात आली. श्रीराम शिरसाठ यांनी संजय लाड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हा समन्वयक ऍड नंदन वेंगुर्लेकर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, सावंतवाडी तालुका सचिव असलम खतीब आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी 26 जानेवारी 2024 रोजी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले.
जवळपास तीन ते चार वेळा रत्नागिरी कोल्हापूर मुंबई येथील वीज वितरणाच्या प्रतापगड या कार्यालयांवर धडक देत तेथील अभियंतांचे लक्ष जिल्ह्यातील वीज समस्येकडे वेधले या मुळे जिल्ह्यातील कामचुकार अधिकारी यांच्या बदल्या झाल्या व यंत्रणा सुव्यवस्थित चालू लागली. कुडाळ तालुक्यातील बारिचशी रखडलेली कामे मार्गी लावली. यात कुडाळ तालुक्यातील आंब्रड, तळवडे सबस्टेशनचे काम आदि अनेक रखडलेली कामे सुरु करण्यास प्रयत्न केले. या पैकी आंब्रड सबस्टेशनचे काम प्रगती पथावर सुरू झाले आहे. व्यवसाय वृद्धी मुळे अध्यक्ष पदाचा राजिनामा जरी दिला असला तरी या पुढे जशी ज्याप्रमाणे मदत लागेल ती करण्यास मी सदैव तत्पर राहीन असे बोलून श्रीराम शिरसाठ यांनी नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष संजय लाड यांना शुभेछ्या दिल्या.

