Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कुमारी श्रेया चांदरकर हिची राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड

कुमारी श्रेया चांदरकर हिची राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड

सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय कला उत्सवात स्पर्धेत वराडकर हायस्कूल कट्टा होणार सहभागी

मालवण | प्रतिनिधी : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत त्रिमित शिल्प या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वराडकर हायस्कूल कट्टाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिची राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड झाली असून दि ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत भोपाळ ,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत सलग चौथ्यांदा सहभागी होणारी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ही जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे.

शालेय शिक्षण मंत्रालय व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली आयोजित नोव्हेंबर २०२४ मध्ये एस. सी. ई. आर. टी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत वराडकर हायस्कूल कट्टाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने त्रिमित शिल्प या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कु श्रेया ही दि ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत भोपाळ ,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एक विजेता संघ व पाच विजेते विद्यार्थी यामध्ये श्रेया हीचा समावेश आहे. यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या विद्यार्थिनीला कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.

कुमारी श्रेया चांदरकर हिचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ‌ ॲड.एस .एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर , अध्यक्ष श्री अजयराज वराडकर उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर ,श्री शेखर पेणकर , सचिव श्री सुनील नाईक,श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्र पावसकर शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, सहसचिव एस.डी. गावडे व सर्व संचालक मंडळ ,माजी मुख्याध्यापक श्री अनिल फणसेकर, श्री.दीपक पेणकर, श्री विजय शेट्टी, मुख्याध्यापक सौ देवयानी गावडे, सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

rapan bottom