Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

वैभव नाईकना कोणी आतून रसद पुरवली हे धोंडी चिंदरकर यांना माहित आहे तर त्यांनी नाव जाहीर करावे

वैभव नाईकना कोणी आतून रसद पुरवली हे धोंडी चिंदरकर यांना माहित आहे तर त्यांनी नाव जाहीर करावे

अर्धवट वक्तव्य करून जनतेत आणि महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये

शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे मांडली भुमिका

मालवण : विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या व्हिजनचा होता. महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांनी एकसंघ केलेल्या कामाचा आहे. काही ठिकाणी मताधिक्य कमी झाले. त्याचा आढावा पक्षाच्या माध्यमातून घेतला जात आहे. असे असताना पराभूत उमेदवार वैभव नाईक यांना निवडणुक काळात आतून रसद पुरवली. त्यांची ताकद वाढवण्यात आली. निलेश राणे यांचा पोलिटिकल एनकाउंटर करण्याचा प्रयत्न झाला. असे वक्तव्य भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले. जर चिंदरकर यांना यां सगळ्या गोष्टी माहित असतील तर त्यांनी त्या व्यक्तींची नावे जाहीर करावीत. अर्धवट वक्तव्य करून जनतेत आणि महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. अशी स्पष्ट भुमिका शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे मांडली प्रसिद्धी पत्रातून मांडली आहे.

आमदार निलेश राणे यांचा विजय महायुतीतील प्रत्येकाला आपला विजय वाटत आहे. विजया नंतर जल्लोष होत असताना नेते मंडळी यांना कार्यकर्ते विजयाचे श्रेय देत आहेत. राणे कुटुंब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांना विजयाचे श्रेय अग्रस्थानी आहेच. सोबतच महायुतीचे नेते मंडळी, कार्यकर्ते हे सर्व विजयाचे शिल्पकार आहेत. किंगमेकर आहेत. गेम चेंजर आहेत. तसेच त्याबाबत कुठे मीडियात काय येते? हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आमच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांचा विजय हेच आमचे लक्ष राहिले आणि तो विजय मिळाला याचा आनंद सर्वाधिक आहे.

कोणी कोणाला रसद पुरवली. विरोधकांना पैशाचे वाटप करून मते फिरवली. मताधिक्य घटवण्याचा प्रयत्न झाला. याबाबत धोंडी चिंदरकर यांना अंतर्गत माहिती मिळाली असेल तर यां मुद्द्याचा चिंदरकर यांनी खुलासा करून ज्या उबाठा कार्यकर्ते यांना कोणी रसद पुरवली त्यांचीही नावे जाहीर करावीत.

आमचे नेते आमदार निलेश राणे स्वतःच्या हिंमत्तीवर विजयी झाले. हा विजय महायुतीचा व जनतेचा आहे. राणे कुटुंबाचा नेतृत्वाचा आहे.

असे असताना धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. वैभव नाईक यांना रसद पुरवली गेली. असे त्यांचे म्हणणे असेल तर त्याबाबत त्यांनी पुर्ण खुलासा करावा. असलेल्या पुराव्यासह नावे जाहीर करावीत. म्हणजे वरिष्ठ नेते त्यावर योग्य तो निर्णय घेतील.

आगामी नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता धोंडी चिंदरकर यांची अर्धवट भुमिका महायुतीला अडचणीची ठरावी अशी असून अविश्वास निर्माण करणारी आहे. निवडणुकीत एकसंघ झालेल्या कामाला छेद देणारी त्यांची भुमिका असून यावर त्यांनी खुलासा द्यावा. असेही महेश राणे यांनी सांगितले.

rapan bottom