त्रिमूर्ती परफ्यूमरी वर्क्स उद्योगाला भेट
नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत क्षेत्रभेट
मिली मिश्रा | सिंधुदुर्ग : मुंबई विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले अर्थशास्त्र विभागाच्या वतीने उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने क्षेत्रभेटीसाठी वेंगुर्ले येथील "त्रिमूर्ती परफ्युमरी वर्क्स" या उद्योगाला भेट दिली.
विद्यार्थ्यांच्या नवसंयोजन यशस्वीतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या भेट उपक्रमात विद्यार्थ्यांनी या उद्योगाचे सर्वेसर्वा अभिषेक राजीव वेंगुर्लेकर यांच्याकडून उद्योजकीय प्रक्रिये संदर्भात माहिती जाणून घेतली. त्याच बरोबर स्वतः प्रश्नावली तयार करून देखील या उद्योगाबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. श्री वेंगुर्लेकर आणि त्यांच्या कर्मचारी टीमने माहिती देण्याबरोबरच कृतीतून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यावेळी विद्यार्थीसुद्धा उद्योजकीय प्रक्रियेत सहभागी झाले होते.
या क्षेत्रभेट उपक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.बी.चौगुले संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एम.आर नवत्रे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी अर्थशास्त्र विभागाचे डॉक्टर जी.पी. धुरी वाणिज्य विभागाचे डॉ. एस.व्ही. परुळेकर उपस्थित होते.

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय विद्यार्थ्यांची उद्योजकीय क्षेत्रभेट
