भाऊ भोगले | बागायत : मालवण तालुक्यातील वेरली येथील प्रसिद्ध श्री देवी सातेरी पंचायतन श्री देव संध्याकाळी उशिरा तरंगांसोबत मुणगेकरवाडी येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या विठ्ठला देवीच्या भेटीला दाखल झाले
विठ्ठलादेवीच्या भेटीला आलेल्या तरंगांसोबत संपूर्ण वेरली गावातील भाविक भक्त ,मोठ्या संख्येने माहेरवासिनी तसेच मुंबईतील भाविक भक्त उपस्थित होते सायंकाळी विठ्ठला देवी चाळा येथे धार्मिक विधी करून निवासासाठी रवाना झाले .
माहीरवासिनी व आजूबाजूच्या गावातील भाविक मंडळींनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती.

दिनांक ५ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी महाप्रसाद घेऊन. स्थानिक भावीक भक्तांचे नवस करणे व फेडण्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर सायंकाळी श्री देवी सातेरी पंचायतन तरंगांसह परतीचा प्रवास करतील .




