एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर तो कलेच्या माध्यमातून आणू शकतो
स्थानिक लोककला ही अभिनय व नृत्य च्या माध्यमातून बाहेर आली पाहिजे
मिली मिश्रा | वेंगुर्ला : अभिनय नृत्य नृत्यकला यांच्या माध्यमातून रेखाटलेली कला व अविष्कार यांच्या पुढील पिढीपर्यंत विचार पोहोचवू शकतो.
एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर मांडायचे व पोचवायचे असतील तर तो त्याच्या कलाविष्काराने पोहोचू शकतो . सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन तसेच त्याच्या विविधतेसाठी जगापर्यंत पोहोचवायचा असेल तर स्थानिक लोककला ही अभिनव व नृत्याच्या माध्यमातून बाहेर आली पाहिजे असे प्रतिपादन वेंगुर्ला उभादांडा येथे सुरू झालेल्या विद्याधर अकादमीच्या दीप प्रज्वलन प्रसंगी उद्घाटक सरपंच निलेश चमणकर यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले व उभादांडा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त मुलांनी आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या अकादमीचा वापर करून घ्यावा तसेच मुलांमधील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि त्यांच्या संस्कारांना वाव मिळण्यासाठी या अकादमीमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन केले. या अकादमीच्या माध्यमातून पुढे पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करावे अशी इच्छा देखील व्यक्त केली.
अकादमीचा उद्देश गराजलो रे गराजलो चळवळीचे पुरस्कर्ते व नाट्य दिग्दर्शक दिग्दर्शक सहदेव धरणे यांनी संबंधितांना सांगितले.
या कार्यक्रमास डॉक्टर सई लिंगवत, नृत्यशिक्षक गुरुनाथ धरणे, डॉक्टर सुप्रिया रावळ, नाट्य अभिनेते कृष्णा कदम, नाट्य अभिनेती कांचन धर्णे, ओंकार धर्णे, पार्वती धर्णे, शरद कलंगुटकर ,सागर धर्णे, साजे परब, रुतुजा नार्वेकर, सायली कलंगुटकर, रुपेश नार्वेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहदेव धर्णे यांनी व आभार प्रदर्शन गुरुनाथ धर्णे यांनी केले.

वेंगुर्ले येथे अभिनव नृत्य अकादमी सुरू
