एस. टी . बस थेट चढली संरक्षण भिंतीवर
नांदगाव फोटो फाटा ब्रिजवर मध्यरात्री दोन वाजता घडला मिशन अपघात
अदित्य बटावले | कणकवली : कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव जवळील ओटवे फाटा ब्रिजवरील मध्यभागी असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा आज पहाटे 2 च्या सुमारास भीषण अपघात झाला
सुदैवाने या भीषण अपघातामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत
अपघाताचे भीषणता एवढी जबरदस्त होती की. बस डिवायडर वर चढली आणि या भीषण अपघाताच्या आवाजाने गाढ झोपी गेलेल्या सर्वांची एकच तारांबळ उडली.
या तिव्र अपघाताचा आवाज ऐकुन महामार्गाचे लगतच राहत असलेल्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी हालचाली सुरू केले.
तसेच बाजूला असलेले भूपेश मोरजकर यांनी देखील संबंधित यंत्रणांना संपर्क करून माहिती दिली.
लगेचच केदार खोत ,प्रभाकर म्हसकर,दीक्षा मोरजकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींच्या मदत कार्यात मदत केली तसेच किरकोळ जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले. महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकानी देखील यामध्ये मोलाची मदत केली. संपूर्ण घटनेची माहिती नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातून हवालदार चंद्रकांत झोरे ,श्री माने तसेच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव घटनास्थळी दाखल झाले

