मिली मिश्रा | कुडाळ : अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव) ॲड. धर्मपाल मेश्राम यांची कुडाळ नगरसेवक विलास कुडाळकर,नगरसेवक राजीव कुडाळकर, गणेश भोगटे यांनी भेट घेतली. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहब आंबेडकर नगर येथील स्थानिकांना घरकुल योजना व घर दुरुस्ती यांपासून वंचित राहावे लागत आहे यासंदर्भात घेतलेली ही भेट होती. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून योग्य तो मार्ग काढला जाईल असे ॲड. मेश्राम यांनी यावेळी सांगितले.
अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे उपाध्यक्ष व सदस्य (सचिव) ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अनुसूचित जाती जमातींसठी असलेल्या योजनांचा आढावा घेतला. भाजप गटनेता नगरसेवक विलास कुडाळकर यांनी विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील देवस्थान इनाम जमिनीत असलेल्या नागरिकांची घरे व घरकुल योजनांचा लाभ या नागरिकांना मिळत नाही यासंदर्भात चर्चा केली. तसेच
शासनाच्या विविध योजना आहेत मात्र या योजना केवळ देवस्थान जमीन असल्यामुळे राबत नाहीत असे ते म्हणाले. तसेच अनुसूचित जाती, जमाती संदर्भात योजनांबाबत ही चर्चा करण्यात आली.
याबाबत चर्चा झाल्यावर अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल व कोणत्या उपाययोजना करता येतील याकडे लक्ष देवू असे सांगितले.

