Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी डे साजरा

सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी डे साजरा

मालवण : सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत एनसीसीडी साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले. यावेळी सुरुवातीला इशस्तवन करण्यात आले, त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले.


झेंडावंदन झाल्यानंतर प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी एनसीसी दिनानिमित्त सर्व एनसीसी आणि इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यामध्ये एनसीसी चे महत्व काय आहे, आपल्या कॉलेजची एनसीसी जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारे नावाजली गेली यासंबंधी माहिती त्यांनी दिली, एनसीसी घेऊन कोणकोणत्या संधी निर्माण होऊ शकतात याचाही उहापोह त्यांनी केला.

भाषणानंतर एनसीसी जे विद्यार्थी आत्ताच सरकारी नोकरीमध्ये लागलेले आहेत, त्यातील माजी एनसीसी विद्यार्थी स्नेहल ढोके ही मालवण तहसील मध्ये महसूल सेवक म्हणून नोकरीला लागलेली आहे. त्याचबरोबर एनसीसी कॅडेट करण मांजरेकर हा सहाय्यक म्हणून लागलेला आहे त्याचबरोबर , एनसीसी कॅडेट राहुल चव्हाण महसूल सेवक म्हणून काम करीत आहे अशा या शासकीय सर्विस मध्ये असणाऱ्या एनसीसी कॅडेटचा सत्कार प्रचारांच्या हस्ते करण्यात आला.

याच वेळी बांबू हॉटेलचे मालक संजय गावडे यांनी जे विद्यार्थी काम करून शिक्षण घेत आहेत दिवस-रात्र मेहनत करतात अशा कष्टाळू कष्टाळू एनसीसी विद्यार्थिनींना दोन सायकली बक्षीस दिल्या त्याचेही वितरण प्राचार्य व संजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.


संजय गावडे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून जे विद्यार्थी घरचा खर्च भागवण्यासाठी मिळेल ते काम करून शिक्षण घेत असतात अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि या दृष्टीने मी या ठिकाणी हा सन्मान करीत आहे असे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
त्याचबरोबर फुग्यांच्या माध्यमातून एनसीसी लोगो तयार करण्यात आला,एनसीसी डे असल्यामुळे एनसीसी नावाचा केक कापण्यात आला असे विविध उपक्रम एनसीसी डे निमित्त राबवण्यात आले.

यानंतर एनसीसी गीत म्हणण्यात आले आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे कमांडिंग सीनियर मनाली पालव या विद्यार्थिनी केले त्याचबरोबर ट्रूप कमांडर कमांडिंग सीनियर राहुल जाधव, सिद्धी मराठे, वैभव पाताडे , दर्पणा जाधव या सीनियरनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन , आणि आभार प्रदर्शन लेफ्टनंट प्रा डॉ एम आर खोत यांनी केले. यावेळी कॉलेजचे सर्व प्राध्यापक ऑफिस स्टाफ एनसीसी चे सर्व विद्यार्थी कॉलेजची इतर विद्यार्थी रामभाऊ पारोळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता

rapan bottom