आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने निधीचे वितरण
अपंग संस्थेचे अध्यक्ष सत्यम पाटील, सचिव दत्ता कामतेकर यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार
मालवण : नगरपालिकेच्या एकूण उत्पन्नातून बांधिल खर्च वजा जाता येणाऱ्या उत्पन्नाच्या ५ % निधी अपंग निधी म्हणून वाटप केला जातो. अपंगाच्या कल्याणासाठी २०१५ मध्ये शासननिर्णय करण्यात आला होता. त्यावेळी ३ % अपंग निधी वाटप केला जात होता . २०१८ मध्ये या शासन निर्णयात सुधारणा करून अपंग निधी ५% करण्यात आला होता.
त्यानुसार नगर पालिकेला निधी वाटप करणे बंधनकारक आहे. अपंगत्वाच्या टक्केवारी नुसार तो निधी वितरित करण्यात येतो.
दरवर्षी गणेश चतुर्थी किंवा दिवाळी च्या दरम्यान या निधीच वाटप केले जात होते. परंतु यावर्षी मात्र अपंग निधी देण्यात आलेला नाही. या संबंधी अपंग संस्थेमार्फत लेखी निवेदन देऊन ही निधीचे वितरण करण्यात आले नाही. असे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.
निवडणुक आचासंहितेचा बागुलबुवा करुन निधी वाटप करण्यात आले नाही. दिवाळीच्या दरम्यान आचारसंहिता लागणार याची पूर्व कल्पना असूनही याबाबत कुठलीही आगाऊ कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही त्यामुळे ऐन दिवाळीत अपंग बांधवाना या निधी पासून वंचित रहावे लागले.शहराच्या विकास कामात अनास्था असणाऱ्या प्रशासकाकडून अपंगाच्या बाबतीतही हेळसांड करण्यात आली. असे त्यांनी म्हटले आहे.
या अपंग निधीबाबतची माहिती प्राप्त झाल्यावर या बहुसंख्य अपंगाना घेवून निलेश राणे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देवून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी आमदार निलेश राणे यांनी आचारसहिता संपताच लगेच हा निधी वितरित करण्याबाबत प्रशासनाला सूचना करुन निधी वितरित केला जाईल या बाबत आश्वासित केले होते. त्यानुसार आचारसहिता संपताच मालवण शहरातील १०३ अपंगाना त्यांच्या खाती निधी जमा करण्यात आला आहे.
याबाबत या संस्थेचे अध्यक्ष सत्यम पाटील आणि सचिव दत्ता कामतेकर यांनी आमदार यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांचे आभार व्यक्त केले.

मालवण ; १०३ अपंग सदस्यांना नगरपरिषद अपंग निधी प्रदान<br>
