Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

चिवला बीच येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे 21, 22 डिसेंबरला आयोजन

चिवला बीच येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे 21, 22 डिसेंबरला आयोजन

स्पर्धेचे 14 वे वर्ष : 6 ते 75 वयोगटातील हजारो स्पर्धाकांचा सहभाग

32 विविध गटात स्पर्धा : लाखोंचो पारितोषिक

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष. डॉ. दीपक परब यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन मालवण चिवला बीच येथे 21 व 22 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष. डॉ. दीपक परब यांनी दिली.

स्पर्धेत एक हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील 26 जिल्ह्यातून आतापर्यन्त सुमारे 1000 स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र सोबत गुजरात, राजस्थान, झारखंड, दिल्ली, तामिळनाडू, छत्तीसगड, उडीसा, पश्चिमबंगाल, गोवा, कर्नाटक येथील निमंत्रित स्पर्धकांनीही नोंदणी केली आहे. आगामी काही दिवस ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे.

आदर्शवत तसेच शिस्तबद्ध व नियोजनबद्ध आयोजनासाठी या स्पर्धेची सर्वत्र ख्याती आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत सुरक्षेच्या विविध अद्ययावत सुविधा तैनात असतात. मालवणच्या सागरी पर्यटन प्रचार प्रसिद्धीत गेली 13 वर्षे या स्पर्धेचे मोठे योगदान राहिले आहे.

स्थानिकांसह, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या योगदानातून तसेच मालवण नगरपरिषद प्रशासनाच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. विविध सामाजिक संस्थाही यां स्पर्धेसोबत जोडल्या आहेत.

विशेषतः भारतातील सर्वात मोठी आणि गेली 13 वर्षे राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेल्या ह्या स्पर्धेत गेल्या वर्षी फिन्स सागरी जलतरण हा स्पर्धा प्रकार प्रथमच आजोजित करण्यात आला. 10 कि.मी. सागरी जलतरण स्पर्धेमध्ये जलतरणपट्टुंचा प्रतिसाद लाभला. तसेच 10 कि.मी. स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करण्याऱ्या स्पर्धकांना राष्ट्रिय व आतरराष्ट्रीय विविध खुल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी मदत होणार आहे.

ह्या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे देशभरातील फक्त चिवला बीच यां एकमेव ठिकाणी होणाऱ्या सागरी स्पर्धेमध्ये गतिमंद, दिव्यांग (हॅंडीकॅप) जलतरणपटू साठी विशेष गटाचे आयोजन स्पर्धेत करण्यात येते. तसेच आलेले सर्व दिव्यांग जलतरण स्पर्धक सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करतात. ही विशेष बाब ठरते.

यावर्षी सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, कॅप, फूड पॅकेट यांसह सर्टिफिकेट, फिनिश मेडल तसेच 32 गटातील प्रथम दहा स्पर्धकांना मेडल, मेरिट सर्टिफिकेट, गिफ्ट आर्टिकल व विजेत्यांना ट्रॉफी तसेच एकत्रित मिळून 5 लाख पर्यत कॅश प्राईज असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंकरिता बीच व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन तसेच कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन 20 व 21 डिसेंबर रोजी चिवला बिच येथे आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धा वाढत असून पुढील वर्षी बीच महोत्सव स्वरूपात यां स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार 21 डिसेंबर रोजी चिवला बिच, मालवण येथे सकाळी 7 वाजल्यापासून 10 किमी व 2 कि.मी., दिव्यांग गट, फिन्स (FINS) सागरी जलतरण स्पर्धा होणार आहे. 22 डिसेंबर रोजी 6 ते 75 वयोगटातील 12 विविध गटात स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात येणाऱ्या स्पर्धाकांची नोंदणी मामा वरेरकर यां ठिकाणी 20 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार आहे. जलतरण स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर पालकर (+९१ ९८१९१६९०२४) व नील लब्दे (+९१ ९६६५३६१७३६) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब, उपाध्यक्ष बाबा परब, उपाध्यक्ष निल लब्दे, ऑरगॅरेझर सेक्रेटरी किशोर पालकर, खजिनदार अरुण जगताप, सदस्य डॉ. पंत वालावलकर, समीर शिर्सेकर, युसूफ चुडेसा, बाबाला पिंटो, लक्ष्मीकांत खोबरेकर, गुरु राणे, मनोज मेथर, अमित हर्डीकर यांसह अन्य सदस्य मालवण वासीय, स्थानिक, नगरपरिषद प्रशासनान, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा संपन्न होणार आहे.

rapan bottom