भाऊ भोगले | बागायत : मालवण तालुक्यातील वेरली येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देवी सातेरी आणि इतर देव पंचायतन सोमवार दिनांक 2 डिसेंबर पासून गावातील देवस्थानांच्या भेटीला निघाले असून श्री देवी सातेरी पंचायतन देव तरंगांसह श्री देव गांगेश्वराच्या भेटीला जाऊन रात्री निवास करून दुपारी महाप्रसाद घेऊन सायंकाळी सहा वाजता श्री देव रवळनाथ (चव्हाटा राई) येथे मार्गस्थ झाले.


यावेळी गावातील सर्व मानकरी भाविक मुंबई निवासी भाविक माहेर्वासीनी पाहुणे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते हर हर महादेव च्या जयघोषाने संपूर्ण वेरली परिसर दुमदुमून सोडला. जागोजागी फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच रस्त्यात सडा रांगोळी घालून गावातील भाविक मंडळींनी देवांचे स्वागत केले सायंकाळी सात वाजता श्री देव रवळनाथाच्या भेटीला सर्व पोहोचले.

