साने गुरुजींच्या एकशे पंचविसाव्या जयंतीचे निमित्त
निलेश जोशी | कुडाळ : २५ ते २९ नोव्हेंबर या कलावधीत रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर (माणगाव) आयोजित साने गुरुजींच्या एकशे पंचविसाव्या जयंती मिमित्त चवदार तळे महाड ते साने गुरुजी जन्मस्थान पालगड व्हाया बॅ .नाथ पै सेवांगण मालवण अशी साने गुरुजी अभियान यात्रा संपन्न झाली.या यात्रेने संत राऊळ महाराज महाविद्यालयासही भेट देऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे यांनी यात्रेमधील सहभागी मान्यवरांचे स्वागत केले. यात्रा संयोजन सदस्य श्रीम.विद्या राणे यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयात सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.तद्नंतर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सानेगुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी यावेळी एक व्याख्यानही संपन्न झाले.व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.शरयू आसोलकर यांनी केले. साने गुरुजी १२५ अभियान समन्वयक राजन इंदुलकर यांनी सानेगुरुजींचे विचार व यात्रेचे प्रयोजन स्पष्ट केले. समाजवादी विचारसरणीचे,व्ही.जे.आय.टी.चे माजी डिन डॉ.संजय मं.गो.यांनी या प्रसंगी आपल्या मुख्य व्याख्यानातून महाविद्यालयाच्या उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सानेगुरुजींचे विचार-संस्कार तसेच आचार याबद्दल ते बोलले. सानेगुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग कथन करून वर्तमान काळात सानेगुरूजींच्या विचारांची आवश्यकता पटवून दिली.झिंदाबादच्या घोषणा देत ,सानेगुरूजींच्या गीतांचे बोल ऐकवत डॉ.संजय मं.गो.यांनी आपल्या व्यख्यांनातून सानेगुरुजींचे योगदान कथन केले व कोकण पर्यंत यात्रेची पार्श्वभूमी सांगितली.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.आभार डॉ. एस.टी.आवटे यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी,प्राध्यापक उपस्थित होते.

