Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पूर्णब्रह्म उपक्रम कौतुकास्पद - शेफ भूषण दुगाडे

पूर्णब्रह्म उपक्रम कौतुकास्पद - शेफ भूषण दुगाडे

पाटकर-वर्दे कॉलेजजध्ये 'पूर्णब्रह्म'च्या चौथ्या पर्वाचा शुभारंभ

६ डिसेंबर पर्यंत चालणार आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

निलेश जोशी | कुडाळ : हॉटेल व्यवसायात वाटचाल करताना जिद्द चिकाटी  आत्मविश्वास बरोबरच श्रम फार महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत नवनवीन स्पर्धा नवनवीन शिकता यावे यासाठी चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज गेली चार वर्ष पूर्णब्रह्म बॅनरखाली राबवत असणारा हा उपक्रम  अतिशय स्तुत्य आहे असे प्रतिपादन नमो वॉटरफ्रंट गोवा हॉटेलचे मुख्य शेफ भूषण दुगाडे यांनी आज पूर्णब्रह्मच्या उद्घाटन प्रसंगी केले
चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेज, सॅटेलाइट सेंटर पिंगुळीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही पूर्णब्रह्म पर्व चौथेचे आयोजन दि. ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत केले आहे. आजपासून सुरु झालेल्या या महोत्सवात आंतरराज्य विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राबरोबरच गोवा व कर्नाटक येथील १५ महाविद्यालयांचा सहभाग आहे. पूर्णब्रह्म पर्व चौथेचे उद्धाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी सेंटरचे हेड ऑफ डिपार्टमेंट विवेकानंद शेट्टी  कॉलेजचे मुख्य डॉ.शेफ अमोल राऊळ, मुख्य शेफ व परीक्षक ए एफ अफसर, भूषण दुगाडे, मुंबई कॉलेजचे समन्वयक नोएल फर्नांडिस, रोशन मोहंती , क्युरी फर्नांडिस, भावेश म्हापणकर, मारिया डिसोझा, दत्तप्रसाद पवार, शेफ शशांक आमरे,  प्रसन्न लाड आणि विद्यार्थी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना श्री दुगाडे म्हणाले, हॉटेल व्यवसायात वाटचाल करताना त्या क्षेत्राची आवड ही महत्त्वाची आहे आणि या क्षेत्रात उतरताना उस्फुर्तपणे उतरणे गरजेचे आहे. पाटकर वर्दे कॉलेजच्या माध्यमातून गेली चार वर्षे हा उपक्रम राबवला जातोय हे निश्चितच विद्यार्थ्यांसाठी  करिअरच्या दृष्टीने चांगले आहे. काहीतरी वेगळे करून दाखवण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते. इच्छा प्रबळ असली तर आपण काहीही करू शकतो. अशा पूर्णब्रह्म महोत्सवात महाराष्ट्र गोवासह १५ कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले हे निश्चितच हॉटेल व्यवसायाला चांगली दिशा देणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेल आराकिल्लाचे मुख्य सेफ ए एफ अफसर यांनी सांगितले की आजचे स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धांमध्ये वाटचाल करण्यासाठी येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर ती आपली आवड प्रेझेंट करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः पुणे, मुंबईसारख्या शहरात हॉटेल व्यवसायाशी निगडित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून दिला जातो, असे असताना या ठिकाणी कोकणात चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज हा उपक्रम गेली चार वर्षे विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे ही निश्चितच  प्रेरणा देणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले
पूर्णब्रह्म उपक्रमाअंतर्गत आजपासून विविध स्पर्धाना प्रारंभ झाला. आज 3 डिसेंबर रोजी  कप केक कॅनव्हास, शेक इट टू मेक इट, खाद्यरांगोळी, शोर साईड शेफ, मेनू डिझायनिंग, टॉवेल आर्ट चॅम्प, फेस पेंटिंग, फोटोग्राफी, या स्पर्धा झाल्या. उद्या दि. ४ डिसेंबर रोजी फ्लावर सेटिंग, नॅपकिन फोल्ड, केक बॉस, क्विझ , सर्व्हिस स्प्रिंट, फ्लेमलेस कुकिंग ,रील मेकिंग या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दि .५ डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ ,फ्लेमलेस  कुकिंग , स्पोर्ट रिले, रील मेकिंग, एकपात्री अभिनय, प्लेट पेंटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे. विविध बक्षीसांसह उत्कृष्ट काॅलेज, लक्षवेधी काॅलेजचा ही गौरव करण्यात येणार आहे.

rapan bottom