Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे आमच्यासाठी देवदूत ठरले !

आमदार निलेश राणे आमच्यासाठी देवदूत ठरले  !

जिल्ह्याभरातील नेत्र रुग्णांनी व्यक्त केल्या भावना

पडवे एसएसपीएम हॉस्पिटल येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 70 रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत. राणे कुटुंबाचे दातृत्व आम्ही ऐकून होतो मात्र आम्हाला ते स्वतः अनुभवता आले. अश्या भावना जिल्ह्यातील अनेक नेत्र रुग्णांनी व्यक्त केल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय ओरोस येथे चार दिवसांपूर्वी सुमारे 70 नेत्र रुग्ण यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आले. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक होते. शस्त्रक्रिये पूर्वी दोन दिवस आधी तपासण्या वगरे असल्याने रुग्ण व नातेवाईक यांची मोठी गर्दी होती. मात्र नातेवाईकांना त्या ठिकाणी कोणतीच व्यवस्था नव्हती. पुठ्ठा्यांचा आधार घेऊन नातेवाईकांनी रात्री झोपावे लागले. तर शस्त्रक्रिये दरम्यान मशीनच बंद पडली. शस्त्रक्रिया थांबल्या. टेक्निशियन कधी येईल मशीन केव्हा दुरुस्त होईल याची कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती.

दृष्टीची समस्या असल्याने जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांचे हाल झाले. तसेच गेले दोन दिवस विविध समस्यांचा सामना करणारे नातेवाईक अधिकच त्रस्त बनले.

मालवण येथील एका निराधार वृद्ध महिला नेत्र रुग्णा सोबत मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मातृत्व आधार संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे त्या ठिकाणी आले होते. नेत्र रुग्णांची समस्या संतोष लुडबे तसेच अन्य काहींच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या कानी नेत्र रुग्णांची समस्या पोहचली. निलेश राणे यांनी सर्व माहिती जाणून घेतली. रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया झाली पाहिजे यासाठी आमदार निलेश राणे यांची तत्परता तात्काळ दिसली.

पडवे एसएसपीएम हॉस्पिटल येथे करण्यात आली सुविधा

आमदार निलेश राणे यांनी सर्व नेत्र रुग्णांवर पडवे एसएसपीएम हॉस्पिटल येथे उपचार करण्याचा निर्णय घेतला. पडवे हॉस्पिटल रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक यांनी त्या ठिकाणी दाखल होत सर्व रुग्णांना पडवे हॉस्पिटल येथे दाखल केले. रुग्णांच्या नातेवाईक यांचीही राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली.

सर्व रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया

पडवे एसएसपीएम हॉस्पिटल येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे 70 रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच उपचारा नंतर सर्व रुग्णांना घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेबद्दल जी आपुलकीची भावना राणे साहेबांनी 1990 पासून जपली तीच भावना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेकांकडून जाणून होतो. आज ती अनुभवता आली. खऱ्या अर्थाने निलेश राणे हे निस्वार्थी लोकनेतृत्व आहेत. अशी भावना संतोष लुडबे यांनी व्यक्त केली.

आमदार निलेश राणे देवदूत

जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया मशीन बंद झाल्या नंतर शस्त्रक्रिये साठी दाखल झालेल्या अत्यावश्यक रुग्णांची समस्या बाबत माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी ज्या तत्परतेने सेवा सुविधा उपलब्ध केल्या त्या देवदूत स्वरूपात होत्या. सर्व व्यवस्था उपचार अगदी मोफत करून रुग्णांना घरी नेण्याची व्यवस्था ही करण्यात आली. अन्यथा जिल्हा रुग्णालयात कधी शस्त्रक्रिया होणार होत्या हे काहीच कळत नव्हते. यापूर्वी अनेकवेळा अनेक रुग्ण शस्त्रक्रिये साठी आल्या नंतर काही तांत्रिक कारणांनी मागे परतले होते. आताही गंभीर स्थिती निर्माण झाली. मात्र संतोष लुडबे यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे आमच्यासाठी देवदूत ठरले. अशी भावना कुडाळ साळगाव येथील नेत्ररुग्ण बाळकृष्ण परब यांसह अनेक रुग्णांनी व्यक्त केली.

rapan bottom