कणकवली : दिनांक ६ ते ८ डिसेंबर रोजी अनुभव विकास केंद्र व गोपुरी आश्रम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रम,कणकवली येथे नेतृत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरांतर्गत युवक व युवतींना भविष्यात रोजगार संधी उपलब्ध, कृषी क्षेत्रात विविध उत्पादनांचे प्रशिक्षण व सर्वांगीण विकास,उद्योजक तयार करणे,विविध क्षेत्रांचा क्रियाकल्पणांद्वारे अभ्यास करून सामाजिक,मानसिक व शारीरिक क्षेत्रात त्याचा अवलंब कशा पद्धतीने करणे ह्याची प्रचिती देणे हे उद्दिष्ट लक्षात घेऊन युवकांना हा मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही युवकांनी युवकांसाठी सुरु केलेली प्रक्रिया आहे. अनुभव शिक्षा केंद्र,सिंधुदुर्ग विभाग व गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने गेली तीन ते चार वर्षे हे कार्य केले जात आहे.

