Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मुंबई गोवा महामार्गावर वरगाव येथे विक्रीसाठी आणलेले खवले मांजर वन विभागाच्या ताब्यात

मुंबई गोवा महामार्गावर वरगाव येथे विक्रीसाठी आणलेले खवले मांजर वन विभागाच्या ताब्यात

तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक

कणकवली : वरगाव येथे मुंबई गोवा महामार्गावरील राजस्थानी धाब्यावर विक्रीसाठी आणलेले खवले मांजर काल वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या मांजराच्या तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.अटक झालेल्यांची नावे विशाल विष्णू खाडे (३४. रा. लोरे नं., कणकवली),संदीप तानाजी घाडी(४४. रा. मुटाट,ता. देवगड), गिरीधर लावू घाडी(४१.रा.मुटाट, ता. देवगड), साहिल रामदास गुरव(१७. रा. लोरे नं.१,ता. कणकवली), गुरुनाथ धोंडू घाडी(५०. रा.मुटाट,ता. देवगड), या प्रमाणे आहेत.


वरगाव येथील राजस्थानी धाब्यावर खवले मांजराची विक्री होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या हॉटेल च्या परिसरात पाळत ठेवून होते. यात खवले मांजर,पाच आरोपी व त्यांनी आणलेली गाडी, महिंद्रा पिकअप (एम. एच. ०७. एस.७०००) ही ताब्यात घेण्यात आली.


सावंतवाडीचे उपसंरक्षक नवाकिशोर रेड्डी, सं. नी. वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडीचे सचिन शिडतुरे, वनपाल सं.व.नि., महेश पाटील; वनपाल मठ, सावळा कांबळे; वनपाल दिगवळे, सर्जेराव पाटील; वनपाल फोंडा, धुळु कोळेकर; वनरक्षक सं.व.नि. प्रमोद जगताप; वनरक्षक तुळस, विष्णू नरळे; वनरक्षक नेरूर, सचिन पाटील; वनरक्षक कळसुली,सिद्धार्थ शिंदे; वनरक्षक भिरवंडे,सुखदेव गळवे; वनरक्षक कोलगाव, ब्रह्मकुमार भोजने; वनरक्षक नियंत्रण कक्ष सावंतवाडी, कोमल करकुड; वनरक्षक करूळ,दीपाली पाटील यांचा सहभाग होता.

rapan bottom