Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करा; पण कर्तव्यांना विसरू नका : ॲड संग्राम देसाई

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करा; पण कर्तव्यांना विसरू नका : ॲड संग्राम देसाई

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा

२६/११ हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली

निलेश जोशी | कुडाळ :संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करा पण कर्तव्याचा विसर पडू देऊ नका. अधिकार व कर्तव्य यांचे एकाच वेळी पालन करू तेव्हा भारतीय राज्यघटनाद्वारे समाजातील प्रत्येक माणसाला अभिप्रेत असलेल्या गोष्टी घडतील .चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल याचा उत्तम विचार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. तिचा सन्मान करा, असे प्रतिपादन महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड .संग्राम देसाई यांनी केले. येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26 नोव्हेंबरला संविधानाच्या स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण झाले याबद्दल बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारलेल्या 'संविधान मानस्तंभाचे' उद्घाटन करण्यात आले. तसेच 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ऍड. देसाई बोलत होते.


कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये एवढ्या उत्साहाने, सन्मानाने संविधान हा दिवस अपवादानेच सजरा केला जात असेल. याबद्दल बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांचेही अभिनंदन केले.


यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, कुडाळ पोलीस स्टेशनचे एपीआय शेखर लव्हे, चेअरमन उमेश गाळवणकर, ध्येय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सामंत, एनसीसी 58 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार घनश्याम कुमार व राकेश कुमार,विविध शिक्षणक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
सुरुवातीला 26 /11 या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व निरपराध नागरिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्तंभावर शेखर सामंत व संग्राम देसाई यांच्या शुभहस्ते पुष्पचक्र व उपस्थित त्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . शेखर सामंत यांनी संविधानाला अभिवादन केल्यानंतर 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना व निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत असताना "सीमेवर उणे ३० डिग्री तापमान असताना आपल्या देशाचे रक्षण करणारे जवान 'त्यांच्या प्रत्यक्ष भेटीतून आलेल्या अनुभवाची उपस्थितांना माहिती करून दिली. त्यांचे जीवन अनुभवण्याचा जो थरारक अनुभव आला; तो सर्वांसमोर कथन केला. देशाबद्दल नागरिकांना अभिमान नाही असे नाही तर सीमारेषेवर असणारी गावें , माणसे जवानांना मदत करतात त्याबद्दल आपण सीमावासियांचे सुद्धा निश्चिंतपणे जीवन जगणाऱ्या भारतीय नागरिकांनी मनापासून आभार मानले पाहिजे. व आपापल्या पद्धतीने आपण देश प्रेम व्यक्त करून देशसेवा केली पाहिजे. असे सांगत अतिशय शिस्तबद्ध रीतीने 26/ 11 चा हा शहिदांना अभिवादन करण्याचा संविधानाच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल चेअरमन उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था यांचे त्यानी कौतुक केले.

अशीच देशनिष्ठा आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्यास आपला देश अधिकच प्रगती करू शकेल .असे सांगून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली व संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाला व एनसीसी च्या उपक्रमाला सुद्धा त्यानी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

rapan bottom