Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

वेरली येथील श्री देवी सातेरी देव पंचायतन आजपासून देवस्थळांच्या भेटीला...

वेरली येथील श्री देवी सातेरी देव पंचायतन आजपासून देवस्थळांच्या भेटीला...

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील वेरली येथे जागृत देवस्थान श्रीदेवी सातेरी आणि इतर देव पंचायतन सोमवार दिनांक 2 डिसेंबर पासून गावातील देवस्थानांच्या भेटीला जाऊन सीमोल्लंघन सोहळा होणार आहे. यानिमित्त सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध धार्मिक विधी नंतर श्री सातेरी पंचायतन देव तरंगांसह श्री देव गांगेश्वराच्या भेटीला जाणार असून गांगेश्वर देवस्थानात रात्री निवास करणार आहेत व गांगेश्वर मंदिरा ठिकाणी स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी श्री देव गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद होणार असून त्यानंतर श्री देवी सातेरी पंचायतन श्री देव रवळनाथ देवालय (चव्हाटा राई) येथे जाणार असून त्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. श्री देव रवळनाथ देवालय येथे यानिमित्त रात्रौ श्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.  त्यानंतर दिनांक 4 डिसेंबर रोजी श्री देव रवळनाथ देवालय येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सायंकाळी श्री देवी सातेरी पंचायतन मुणगेकरवाडी  वाडी येथील विठ्ठलादेवी देवस्थान येथे भेटीला येणार असून विठ्ठलादेवी येथे मुक्कामी राहणार आहेत. यावेळी रात्रौ विठ्ठलादेवी चाळा येथे भाविकांचे नवस बोलणे फेडणे आदि कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी विठ्ठलादेवी देवस्थान येथे दुपारी महाप्रसाद होणार आहे त्यानंतर श्रीदेवी सातेरी पंचायतन देवतरंगांसह सातेरी देवी मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात महाप्रसाद होणार असून सायंकाळ नंतर पाच दिवसांच्या देव परिक्रमा भेट सोहळ्याची विधिवत सांगता होणार आहे.मागील कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच हा सोहळा वेरली गावात होणार असल्याने वेरली गावातील मुंबई निवासी ग्रामस्थ मुंबई निवासी माहेरवासीनी पाहुणे आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात वेरली गावात दाखल झालेले आहेत, तरी सर्व भाविकांनी या संपूर्ण सोहळ्याचा उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन वेरली गावातील ग्रामस्थांनी केले आहे.

rapan bottom