संजय माने | पोईप : साडेसतरा खेड्यांचा अधिपती म्हणुन ख्याती असलेल्या व मालोंड- बेलाचीवाडी गांवचे ग्राम दैवत श्री देव नारायण पंचायतन मंगळवार दि. ३ डिसेंबर पासून देवस्थळांच्या भेटीला निघणार असून यामध्ये श्री देव नारायण मंदिरातुन तरंगासह वाजत गाजत श्री देव ब्राम्हण येथे भेट, सायंकाळी तिथुन श्री देव गांगेश्वर मंदिरात प्रस्थान दुसऱ्या दिवशी कुळाचार होम महाप्रसाद तिसऱ्या दिवशी सकाळी धार्मीक विधी आटोपून श्री देव पावणाई-रवळनाथ मंदिर भेटीला, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी मालोंड चाळादेव देवस्थानास भेट देवून श्री देव चव्हाटा मंदिर येथे प्रस्थान रात्री धार्मीक, सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबर रोजी दुपारी महाप्रसाद, सायंकाळी वाजत गाजत तरंगासह श्रीदेव नारायण मंदिरात प्रस्थान होणार आहे. तरी या संपूर्ण सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान मंडळाने केले आहे.

