Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

डी. बी. ढोलम पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबिराचा 167 ग्रामस्थांनी घेतला लाभ

डी. बी. ढोलम पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबिराचा 167 ग्रामस्थांनी घेतला लाभ

मालवण : महर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट, व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम स्मृतीस्थळ कावळेवाडी वराड येथे करण्यात आले होते.

या आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, यूरोलॉजी तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल सर्जरी, नेफ्रोलॉजी तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग चिकित्सा, प्रसुतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, मोफत रक्त तपासणी, इसीजी व मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचा मालवण, वराड, कट्टा, नांदोस, गुरामवाडी, कावळेवाडी या भागातील सुमारे 167 गरजू ग्रामस्थांनी लाभ घेतला.

यावेळी कै. डी . बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी तसेच समस्त ढोलम कुटुंबीय यांच्यावतीने प्रा . डी. बी. ढोलम यांचे समाजकार्य अशा पद्धतीने पुढे सुरू ठेवण्यासाठी असेच समाजोपयोगी उपक्रम यापुढेही राबविले जातील असे सांगितले. यावेळी देवेन (पप्पू) ढोलम, कै डी बी ढोलम यांच्या मुली बेबी, रेखा, मनीषा, दीपक भोगटे, दादा रावले, महादेव मलये, अनिल फणसेकर, छोटू ढोलम, बाबा ढोलम, अवधूत चव्हाण, सुनील पोखरणकर, प्रनेश ढोलम, गणपत पोखरणकर , नितेश खडपे, विकास लुडबे, नितीन लुडबे , आश्विन ढोलम, अनिल चव्हाण, परमानंद वेंगुर्लेकर, सतीश वेंगुर्लेकर,योगेश वेंगुर्लेकर, अवधूत वेंगुर्लेकर, रोहन चव्हाण, प्रेम परब, दिलीप वेंगुर्लेकर, डॉ.प्रथमेश वालावलकर, समीर रावले, प्रवीण मीठबावकर , सागर चव्हाण, ऍड. प्रदीप मिठबावकर, गणेश वाईरकर, वंदेश ढोलम, प्रसाद शिरोडकर, शिवा शिरोडकर, विनू चव्हाण तसेच कै डी.बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी चे सदस्य व कावळेवाडी लुडबेवाडीतील ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

rapan bottom