Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

चिंदर सडेवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश

चिंदर सडेवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश

दिशांत प्रशांत कांबळी याला गोल्ड मेडल, आयुष अपसिंग वसावे याला सिल्वर मेडल तर मयुरी किरण कांबळी हिला ब्रॉन्झ मेडल

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थांनी रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशनसाठी सहभाग घेतला होता. यातील कलर कॉम्पिटिशन यात प्रविष्ठ झालेल्या इयत्ता दुसरी मधील दिशांत प्रशांत कांबळी याने गोल्ड मेडल मिळवले आहे.

दरम्यान, प्रशालेतील इयत्ता चौथी मधील आयुष अपसिंग वसावे याला सिल्वर मेडल तर इयत्ता तिसरी मधील मयुरी किरण कांबळी हिने ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना नॅशनल लेवल चे सहभागी प्रमाणपत्र मिळाले.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थी खंबीर उभा राहिला पाहिजे. विविध स्पर्धेत उतरला पाहिजे. यासाठी शाळा स्तरावरही शासनाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आयोजित होत असतात. तसेच अन्य विविध स्पर्धात सहभागी होऊन त्यांचा अधिक सराव होईल आणि मुलांना अधिक काहीतरी शिकता येईल, मुले स्पर्धेच्या युगासाठी तयार होतील. यासाठी अश्या स्पर्धा निश्चितच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देताना त्यांचा आत्मविश्वास वाढवाणाऱ्या ठरतात. असे मत मार्गदर्शक शिक्षिका सौ. शुभांगी लोकरे -खोत यांनी मांडले.

शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना अधिक वाव मिळावा शालेय अभ्यासक्रमां व्यतिरिक्त इतर ही परीक्षांना मुलांना प्रविष्ठ होण्याची संधी मिळावी यासाठी अश्या स्पर्धात नेहमीच मुले सहभागी होत असतात. तसेच उल्लेखनीय यश संपादन करतात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, उपाध्यक्ष सौ स्वाती सुर्वे, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड, प्रीती कांबळी, मानसी गोसावी, करिष्मा कानविंदे, स्वरा घागरे, हडकर, वसंती वसावे, सुहासिनी गोसावी, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

rapan bottom