Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

भाऊ भोगले | बागायत : राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत कै .पांडुरंग सरनाईक जयंती निमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे करण्यात आले होते


या स्पर्धेमध्ये 9 शाळांनी भाग घेतला होता व 16 विद्यार्थी सहभागी झाले होते . मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.स्पर्धेचे नियम विद्यार्थ्यांना सांगून स्पर्धा सुरू करण्यात आली. स्पर्धा शांततेत पार पडली.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व व त्याचे फायदे परीक्षकांनी सांगितले व राधारंग फाउंडेशनच्या विविध योजनांची माहिती श्री विलास सरनाईक यांनी दिली . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच .कुबल यांनी राधारंगच्या उपक्रमांची स्तुती व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी राधारंग फाउंडेशन चे खजिनदार श्री सचिन सामंत यांनी वकृत्व स्पर्धा राबविण्यामागचा आपल्या संस्थेच्या उद्देश स्पष्ट केला व सर्व आयोजकांचे व शाळा प्रशासनाचे आभार मानले. राधारंगच्या ज्येष्ठ ,सर्वांच्या मार्गदर्शक सर्वांना स्फूर्ती देणाऱ्या सौ अरुणा सामंत यांनी कै. पांडुरंग सरनाईक यांचा जीवन पट सर्वांसमोर मांडला.


या स्पर्धेचा निकाल


प्रथम क्रमांक : कु.ध्रुवी महेश भाट, वराडकर हायस्कूल कट्टा ,


द्वितीय क्रमांक : कु .पार्थ प्रदीप सामंत, टोपीवाला हायस्कूल मालवण

तृतीय क्रमांक : कु.धृती केशव भोगले, भरतगड इंग्लिश मीडीअम स्कूल मसुरे,

उत्तेजनार्थ : कु.विशाखा विवेक पारकर, शिरवंडे हायस्कूल

असा परीक्षकांनी जाहीर केला . या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री विनोद सातार्डेकर (केंद्र शाळा मसुरे)व श्री संजय पेंडुरकर (वराडकर हायस्कूल कट्टा)लाभले होते. यावेळी राधारंग च्या सर्व मान्यवरांनी भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे मनःपूर्वक आभार मानले कारण त्यांनी या कार्यक्रमासाठी श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटचा हॉल दिला होता त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पीएच कुबल यांचेही मनःपूर्वक आभार मानले कारण त्यांनी या स्पर्धेला लागणारी सर्व व्यवस्था पुरविली व प्रशालेच्या शिक्षक वर्गांनीही कार्यक्रमाला प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपलब्ध करून दिले त्यांचेही आभार मानण्यात आले.

यावेळी माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री शरद लाड , चौके हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक श्री दत्तप्रसाद परुळेकर ,हिवाळे हायस्कूलच्या पूर्वा आंगणे, तसेच मालवण तालुक्यातील प्रसिद्ध सिव्हील इंजिनियर श्री प्रदीप सामंत ,माड्याचीवाडी कुडाळ चे श्री नाईक सर, सौ शिंगरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एम .एस. एफ. सी. विभागाच्या निदेशिका हर्षदा पाटकर कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास सरनाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री केशव भोगले यांनी केले.

rapan bottom