Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर मालवण बसस्थानक इमारत काम गतिमान

आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर मालवण बसस्थानक इमारत काम गतिमान

भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व सहकाऱ्यांनी केली पाहाणी

जुनी जीर्ण इमारत पाडली जाणार ; नवी इमारत लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मालवण | प्रतिनिधी : आमदर निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहेत. मालवण कुडाळच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ गेल्या चार वर्षात जनतेने पहिली. आमदार पदी विजयी झाल्यानंतर त्यांनी नव्या तसेच रखडलेल्या विकास प्रकल्पांकडे विशेष लक्ष दिले आहे. आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर मालवण बसस्थानक इमारत काम ही गतिमानपणे सुरु झाले आहे. लवकरात लवकर काम पुर्ण होताच जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त करून नवी इमारत प्रवाशांच्या सेवेत असेल. असा विश्वास भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.

मालवण बसस्थानक येथील नव्या इमारत कामाची पाहाणी गुरुवारी एसटी प्रशासन अधिकारी, ठेकेदार एजन्सी आणि भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, भाजपा युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, दादा वाघ, नंदू देसाई, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या इमारतीसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु मागील पाच वर्षे वैभव नाईक यांच्या अपयशी कार्यकाळात इमारतीचे काम रखडत सुरु होते. त्यांनी फक्त ठेकेदारी हिशेबाने कामाकडे पाहिले असावे. त्यामुळेच काम रखडले. मात्र मागील अडीज वर्षे महायुती कार्यकाळात विकासकामानी गती पकडली. राणे साहेब यांच्या पाठपुराव्याने बसस्थानक इमारतकामही सुरु झाले. लवकरात लवकर इमारत काम पुर्ण होऊन प्रवासी वर्गाच्या सेवेत इमारत दाखल व्हावी. तसेच सध्य स्थितीत याठिकाणी असलेली शौचालय व्यवस्था योग्य नसल्याने इमारत काम पुर्ण होई पर्यत त्यात सुधारणा तसेच नगरपालिका माध्यमातून फिरत्या शौचालयाची व्यवस्था प्रवासी वर्गासाठी करून घ्यावी. जीर्ण इमारत काही ठिकाणी कोसळते आहे. त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी. एकूणच नव्या इमारतीचे अंतिम टप्प्यात राहिलेले काम लवकर पुर्ण करावे. जुनी इमारत जमिनदोस्त करून नवी इमारत प्रवासी वर्गाच्या सेवेत लवकर यावी. याबाबत विस्तृत चर्चा पाहाणी दरम्यान बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर यांनी केली.

तसेच लवकरच खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण कुडाळ मधील विकासकामांच्या आढावा बाबत बैठक होईल. याचा विचार करता गतिमान काम व्हावे. असे मोंडकर, आचरेकर यांनी सांगितले.

प्रवासी वर्गाची गैरसोय दूर व्हावी,  बसस्थानक इमारत लवकर प्रवासी सेवेत यावी यां उद्देशाने आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार करण्यात आलेल्या यां पाहाणी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली. लवकरात लवकर नवी इमारत प्रवसी वर्गाच्या सेवेत असेल असे सांगण्यात आले.

फोटो : मालवण बसस्थानक इमारत बांधकाम ठिकाणी पाहाणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व उपस्थितीत भाजपा पदाधिकारी. (अमित खोत, मालवण)

rapan bottom