वनशक्ती संस्थेने राबविली भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम
'नीलक्रांती' सह इतर संस्थांचाही सहभाग
निलेश जोशी |कुडाळ : सागरी परिसंस्थेच जतन करण्याच्या हेतून वनशक्ती संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात मालवण मध्ये बुधवारी समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अशा प्रकारची भारतातली पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई, नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एनव्हारमेंट यांच्या सहकार्यान हि मोहीम राबविण्यात आली. स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला.

सागरी परिसंस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेन लक्ष केंद्रित केल. स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतरान जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले. म्हणूनच समृद्ध जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातल्या या सागरी परिसंस्थेच संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छ्ता मोहीम अत्यंत महत्वाची ठरली आहे.

सागरी अधिवासांचे जतन करणे आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवण या दोन्हींच्या महत्त्वावर या मोहिमे दरम्यान भर देण्यात आला. त्याच बरोबर या मोहिमेमुळे यामुळे देशभरातील अनेक संस्थांना आणि संघटनांना प्रेरणा मिळेल असं यावेळी वनशक्तीचे दयानंद स्टॅलिन यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या मोहिमेत वरिष्ठ शास्त्रज्ञ अशोक कदम, रविंद्र मालवणकर, यूएनइपी चे को ऑर्डिनेटर रोहित सावंत, MPCB चे आर ओ जयवंत हजारे, एसआरओ प्रमोद माने, नीलक्रांती संस्थेचे रविकिरण तोरसकर, रुपेश प्रभू आदी सहभागी झाले होते. तसेच जगदीश तोडणकर, सुजित मोंडकर, नुपूर तारी, भूषण जुवाटकर, जितेंद्र शिर्सेकर,राजू मोरजकर, वसंत येरम, रुपेश प्रभू आणि रोहित सावंत हे स्कुबा डायव्हर्स या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी बाबी जोगी, श्रमिक मच्छीमार संघ.दादा वेंगुर्लेकर, मातृत्व आधार संस्था, सौरभ ताम्हणकर युथ फॉर बिट्स ,चारुशीला देवलकर, कु.मेगल, स्वाती पारकर, दर्शन वेंगुर्लेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.मालवण नगरपरिषद व वनखात्याचे या मोहिमेला मोलाचे सहकार्य मिळाले





