डिजिटल बोर्डचे डॉ. जी टी राणे यांच्या हस्ते उदघाटन
निलेश जोशी | कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये वार्षिकांक भरारीचे प्रकाशन श्रीमती सत्यवती तातेभाऊ राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या भरारीचे प्रतिबिंब वार्षिकांकामधून अनुभवता येते. या प्रकाशन सोहळ्याला क.म.शि.प्र.मंडळाचे उप कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, क.म.शि.प्र.मंडळाचे माजी उपाध्यक्ष भाईसाहेब तळेकर, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रा.डॉ.ए.एन.लोखंडे, आदी उपस्थित होते.
भरारीचे हे औचित्य साधून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक अजित राणे यांचा क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री.अरविंद शिरसाट यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक अजित राणे यांची विशेष मुलाखत पत्रकार निलेश जोशी यांनी घेतली. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत यश मिळवले पाहिजे त्यासाठी मेहतीला पर्याय नाही असे मुलाखतीत अजित राणे यांनी सांगितले.
यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या स्मार्ट बोर्डचेही उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी यशाला कोणताही शॉर्टकट नसल्याचे आवर्जून नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते श्रीमती सत्यवती ता. राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष ऍड.निलांगी रांगणेकर, ऍड. अमोल सामंत, सौ.नंदिनी देसाई, नंदू म्हापसेकर, सी.ए.सौ.जयंती कुलकर्णी आदींनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अजित राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कीर्ती गाजते चिरकाल अशी ही ज्ञानभूमी कुडाळ असे शब्द रेखाटूनन मुखपृष्ठ साकार करणारे प्रा.संतोष वालावलकर यांचे याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले.
क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी अपयशाने खचून न जाता सतत कार्यप्रवण असणारे पुढे यशस्वी होतात असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. क.म.शि.प्र.मंडळाचे सरकार्यवाह अनंत वैद्य यांनीही आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त करत संयुक्त कुटुंबाची सकारात्मक बाजू मांडली.माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष ऍड. निलांगी रांगणेकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत यशवंत होण्यासाठी स्वप्न जागेपणी पाहिली पाहिजेत व तसे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत याकडे विद्यार्थी व इतर सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले. माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक अजित राणे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी दिनेश आजगावकर, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, प्रा.ए.ए.मर्गज, बंड्या जोशी, नरेंद्र चव्हाण, डॉ.संजय केसरे , माजी मुख्याध्यापक अनंत जामसंडेकर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरारीचे संपादक प्रा.डॉ.भारत तुपेरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय कॅप्टन डॉ.एस.टी.आवटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आर.वाय.ठाकूर यांनी केले. आभार मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शरयू आसोलकर यांनी केले. महाविद्यालयाचा प्रध्यापक वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.

