Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे कुडाळ मालवणाचा गतिमान विकास करतील!

आमदार निलेश राणे कुडाळ मालवणाचा गतिमान विकास करतील!

भाजपा मालवण महिला तालुकाध्यक्षा सौ. माधुरी मसुरकर यांनी व्यक्त केला विश्वास : वराड गावात विजयी जल्लोष

मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ मतदारसंघात आता विकासाची गंगा येणार आहे. विकासाचे व्हिजन असलेले आमदार निलेश राणे यांच्या विजया नंतर कुडाळ मालवणचा निश्चितच गतिमान विकास होईल. जनतेला अपेक्षित विकास आ. निलेश राणे साध्य करतील. असा विश्वास भाजपा मालवण महिला तालुकाध्यक्षा सौ. माधुरी मसुरकर यांनी व्यक्त केला आहे. विकासाचा मार्ग आता दुहेरी होणार आहे. खा. नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या माध्यमातून निधी येईल. तर आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून महायुती सरकारचा निधी येणार आहे. हा विजय नव्या विकासपर्वाची सुरवात असल्याचे माधुरी मसुरकर यांनी सांगितले.

कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या विजयानंतर महायुती पदाधिकारी कार्यकर्ते सर्वत्र विजयी जल्लोष सुरु आहे. मालवण तालुक्यातील वराड गावात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी माधुरी मसूरकर यांनी उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. खा. नारायण राणे साहेब, सौ. निलमताई राणे यांच्या मार्गदर्शनात गेली 25 दिवस महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोरदार प्रचार यंत्रणा रावबली. आमदार निलेश राणे यांना सर्वांच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत होता. एकूणच महिला पदाधिकारी यांनीही प्रचारात आघाडी घेत घरोघरी प्रचार केला.

जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रांतिक सदस्या सौ. रश्मी लुडबे, माजी जिप अध्यक्षा सौ. सुमेधा पाताडे व अन्य सहकारी यांच्या सोबतीने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा कुडाळ मालवण संयोजक बाबा परब व अन्य पदाधिकारी यांचेही सहकार्य व मार्गदर्शन प्रचारा दरम्यान लाभले. महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह जनतेची साथ सर्वच ठिकाणी लाभली. असे सांगत माधुरी मसुरकर यांनी जनतेचे आभार मानले. यासोबतच महायुतीच्या महाविजयात माता भगिनी समस्त महिला वर्गाची मोठी साथ लाभली. सर्वांचे मनःपूर्वक आभार असेही मसुरकर यांनी सांगितले.

rapan bottom