विजया बद्दल दोन्ही नेत्यांना दिल्या शुभेच्छा
विविध विकासात्मक विषयावर चर्चा
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, भाजपा मालवण शहर प्रभारी संतोष गांवकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे यांनी मुंबई येथे भेट घेतली. विजया बद्दल दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यातील महायुतीच्या महाविजयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी विविध विकासात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्गात गतिमान विकासाबरोबर रोजगाराची दालने खुली करणे, आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष यासोबत जनहिताची विकासकामे यांना प्राधान्य राहील. असे यावेळी नेत्यांनी आश्वस्त केले.

