Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आंगणेवाडी भराडी देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय!

आंगणेवाडी भराडी देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय!

आंगणेवाडी येथे ना. रवींद्र चव्हाण यांनी भराडी देवी चरणी नतमस्तक

मालवण : आंगणेवाडी भराडी देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर वाटचाल करत असताना राज्यातही गतिमान विकासासाठी महायुतीच्या विजयासाठी जनतेने कौल दिला. आंगणेवाडी भराडी देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय झाला. महायुती सरकार जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे बोलताना व्यक्त केला.

महायुतीच्या महाविजयानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले. आंगणेवाडी येथे भराडी देवीचे त्यांनी दर्शन घेतले. श्री क्षेत्र आंगणेवाडी येथील भराडी आईच्या दर्शनाने प्रत्येक मनोरथ पूर्ण होते, अशी आम्हा कोकणवासीयांची भावना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी आई भराडी देवीचे दर्शन घेत भाजप-महायुतीच्या यशासाठी आईच्या चरणी साकडे घातले होते. आईच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय व्हावा हे मनोरथ पूर्ण झाले. त्यानंतर आज पुन्हा एकदा श्री क्षेत्र आंगणेवाडीला भेट देत भराडी आईचे मनोभावे दर्शन घेतले.

डोंबिवलीसह महाराष्ट्राच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहणार असून यासाठी बळ द्यावे अशी प्रार्थना आईचरणी केली. असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले..याप्रसंगी देवस्थानच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. यावेळी अर्जुन (काका) आंगणे, जयप्रकाश आंगणे, आत्माराम आंगणे, सतीश आंगणे, शांताराम आंगणे, सुधाकर आंगणे, जयवंत आंगणे, सचिन आंगणे, दिनेश अंगणे, गणेश आंगणे, सत्यविजय आंगणे, सुभाष आंगणे, अमोल आंगणे, प्रतीक आंगणे, सहदेव आंगणे, बाळा आंगणे, बाबू आंगणे, नंदू आंगणे, सुधाकर आंगणे, गणेश आंगणे, समीर आंगणे आणि आंगणे कुटुंबीय यांसह जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे उपस्थित होते.तसेच पदाधिकारी माजी आमदार ऍड. अजित गोगटे,भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, कुडाळ मालवण संयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब, मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बंड्या सावंत, माजी उपसभापती राजु परुळेकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, महेश बागवे, सचिन आंबेरकर, दाजी सावजी, संचालक आबा हडकर, उद्योजक संजय कदम, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, पेंडूर जिप प्रभारी सतीश वाईरकर, माजी नवरसेवक गणेश कुशे, पुजा करलकर, बबलु राऊत, शेखर फोंडेकर, तालुका सरचिटणीस विजय निकम, विरेश पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, प्रमोद करलकर यांसह शिवसेना जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या महाविजयाबद्दल सर्वांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले.

कोकण हा महायुतीचा बालेकिल्लाच!कोकणातील 39 विधानसभा जागांपैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचा कौल पुन्हा एकदा जनतेने दिला. राज्यातही तेच चित्र राहिले. सर्वासामान्य जनता यांना केंद्रस्थानी ठेवून महायुतीचे सरकार काम करत असताना अनेक जनहिताच्या योजना राबवल्या. त्याला जनतेने साथ देताना पुन्हा महायुतीच्या बाजूने दिलेला हा कौल आहे. जनतेचे हे सरकार जनहिताच्या व गतिमान विकासाच्या दृष्टीने सेवाकार्य करेल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

rapan bottom