मालवण | प्रतिनिधी : महायुतीच्या महाविजयानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले. आंगणेवाडी येथे भराडी देवीचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी भाजपा कुडाळ मालवण संयोजक तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी महायुतीच्या महाविजया बद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा युवा
मोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड, विक्रांत नाईक यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीच्या महाविजया बद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना बाबा परब यांनी दिल्या शुभेच्छा <br>
