पेंडूर जिल्हापरिषद भाजपा प्रभारी सतीश वाईरकर यांनी मानले सर्वांचे आभार
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या विजयात 'पेंडूर' जिल्हापरिषद मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले. महायुती सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे हे सांघिक यश आहे. सोबतच सर्व मतदार यांचीही साथ व मतदान रुपी आशीर्वाद यामुळे हा विजय शक्य झाला. असे सांगत पेंडूर जिल्हापरिषद भाजपा प्रभारी सतीश वाईरकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
तळगाव, वराड, कट्टा वरची गुरामवाडी, पेंडूर, काळसे, आंबेरी, साळेल, धामापूर गावातील सर्व महायुती नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार. हा विजय निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा आणि जनतेचा आहे. आमदार निलेश राणे विकासासाठी कटीबद्ध राहतील. गतिमान विकासाची द्वारे खुली झाली आहेत. खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे असा विकासाचा दुहेरी मार्ग असेल. असेही सतीश वाईरकर म्हणाले. विजयाचे श्रेय सर्वांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

