Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

माळगाव हायस्कूलच्या २५ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

माळगाव हायस्कूलच्या २५ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप


कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम

भाऊ भोगले | बागायत : मालवण तालुक्यातील माळगाव येथील ऍडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव या प्रशालेमध्ये 25 विद्यार्थ्यांना कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचे आयटी हेड श्री दीपेश गोसावी , गोवा ब्रांच मॅनेजर श्री सुरेश साळगावकर आणि श्री संकेत प्रभुदेसाई आणि शाळा समिती अध्यक्ष अरुण भोगले खजिनदार महादेव सुर्वे , संचालक हेमंत हडकर मुख्याध्यापक श्री. उदय जोशी, माजी विद्यार्थी पत्रकार अमोल गोसावी हे उपस्थित होते.


यावेळी कंपनीचे आयटी हेड श्री. दीपेश गोसावी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड हा पोस्ट आणि बँकेप्रमाणेच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असून यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही केलेली छोटी छोटी गुंतवणूक भविष्यात फार मोठा परतावा देऊ शकते. एसआयपी या पर्यायातून तुम्ही छोट्या रकमेतून गुतवणूक कॅमेरा रोबेको मध्ये गुंतवणूक करू शकता . लोकांमध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी कंपनीच्या वतीने मार्गदर्शन शिबिरेही घेतली जातात. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून गेली दोन वर्षे सिंधुदुर्गातील शाळांमधील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम कंपनी राबवत आहे. सायकलमुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांचे आरोग्य ही सुदृढ राहावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सायकलचा योग्य वापर करून स्वतःची प्रगती साध्य करावी.


यावेळी शाळा समिती अध्यक्ष अरुण भोगले यांनी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडअसेट मॅनेजमेंट कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलच्या स्वरूपात दिलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. माळगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी पत्रकार अमोल गोसावी यांच्या विशेष प्रयत्नातून प्रशालेच्या २५ विदयार्थ्यांना सायकल उपलब्ध झाल्या त्याबद्दल त्यांचेही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

यावेळी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचे आयटी हेड दिपेश गोसावी , गोवा ब्रांचं मनेजर सूरज साळगावकर, संकेत प्रभुदेसाई, संस्था पदाधिकारी अरुण भोगले, महादेव सुर्वे , हेमंत हडकर, मुख्याध्यापक उदय जोशी आदी उपस्थित होते.

rapan bottom