Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

महायुतीला सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाची पुन्हा साथ

महायुतीला सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाची पुन्हा साथ

भाजपा सिंधुदुर्ग मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : महायुतीचे उमेद्वार आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, आ. नितेश राणे यांना किनारपट्टी भागात तब्बल ९७९४ एवढे मताधिक्य मिळाले आहे १०८ पैकी ९१ बुथवर मताधिक्य मिळाले. महायुतीला सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टीवरील समुदायाने पुन्हा साथ दिली आहे. असे सांगत भाजपा सिंधुदुर्ग मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने महत्वाचा वाटा उचलला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ किमी. च्या किनारपट्टीवर देवगड (नगर पंचायत), मालवण, वेंगुर्ला अश्या दोन नगरपालिका असून बत्तीस ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०८ मतदान केंद्रे (बूथ) असून यापैकी ९१ मतदान केंद्रावर महायुती आघाडीवर आहेत. महायुतीला २९ हजार ३९४ मते मिळाली. किनारपट्टी भागात तब्बल ९७९४ एवढे मताधिक्य महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला मिळाले.

महायुतीच्या या महाविजयात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे भाजपा मच्छीमार सेल तर्फे आभार. किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तिन्ही अनुभवी आणि सक्षम आमदार विधानसभेत निवडून गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच केंद्र व राज्यात महायुतीचे डबल इंजिन सरकार असल्यामुळे मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल. असेही भाजपा सिंधुदुर्ग मच्छीमार सेल जिल्हा संयोजक
रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी सांगितले.

rapan bottom