Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन साजरा

किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन साजरा

ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या ठिकाणी पूजन

मालवण | प्रतिनिधी : जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत मालवण वायरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पाषाणावरील श्री गणेशाची पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात आले.

मालवणच्या समुद्रातील कुरटे बेटावर किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी निश्चित केल्यानंतर १६६४ साली २५ नोव्हेंबर रोजी मालवण वायरी येथील एका पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते श्री गणेशाचे (मोरयाचे) पूजन करून किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. तेव्हा पासून या पाषाणाला मोरयाचा धोंडा म्हणून संबोधले जाते. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या वतीने साजरा करण्यात येतो. यनिमित्त होणाऱ्या पूजेला शासकीय पूजेचा दर्जा प्राप्त आहे.
यानिमित्त सकाळी मोरयाचा धोंडा येथे रविकिरण आपटे यांच्या पौरोहित्याखाली प्राध्यापक आर. एन. काटकर यांच्या हस्ते विधिवत गणेश पूजन करण्यात आले. तसेच मोरेश्वर चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. यावेळी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, दत्तात्रय नेरकर, प्रदीप वेंगुर्लेकर, दादा वेंगुर्लेकर, रत्नाकर कोळंबकर, चिंतामणी तोरसकर, रामगिरी बुवा, संतोष लुडबे, रविकिरण तोरसकर, निखिल नेरकर, मंजुश्री काटकर यांच्यासह शिवप्रेमी नागरिक व पर्यटक उपस्थित होते.

rapan bottom