पोईप | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेना भाजपा रिपब्लिकन महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे आठ हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आले. निलेश राणे यांच्या विजयामागे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आहे. निलेश राणे यांच्या विजयाचा जल्लोष रविवारी संध्याकाळी दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थित पोईप गावात रॅली काढण्यात आली आणि जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . मालवण तालुक्यात महायुती सरकारने केलेली कामे, लाडकी बहीण योजना माध्यमातून सर्व सामान्य महिलावर्ग यांना न्याय देण्याचे काम केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येऊ शकेल, असा दावा पदाधिकारी यांनी केला. यावेळी वैभव नाईक यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, अनिल कांदळकर, राजू देसाई, दया देसाई,पोईप शिवसेना शाखाप्रमुख नारायण राणे, उपाशाखाप्रमुख श्रीधर पालव, बाबाजी नाईक, सरपंच श्रीधर नाईक,मिलिंद नाईक,समीर माधव, विलास माधव,महेश पालव, बाळा पालव, संतोष पालव, शिवसेना व भाजप पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

