१८ कराटे पटूची विभाग स्तरावर निवड
मालवण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने कासार्डे येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे प्रशालेतील ३५ खेळाडुंनी घवघवीत यश संपादन केले आहे.यापैकी तब्बल १८ कराटे पट्टूंची कोल्हापूर विभागीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून यावर्षीही प्रशालेची कराटे खेळातील यशाची परंपरा या खेळाडूंनी कायम ठेवली आहे.
शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यशस्वी झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे-
मुलींच्या गटातून-
14 वर्षाखालील मुलींच्या गटात-
प्रथम क्रमांक-कु.प्रिती क्षीरसागर,कु.धैर्या परब
द्वितीय क्रमांक -कु.प्रसिध्दी जोशी
17 वर्षाखालील मुलींच्या गटात-
प्रथम क्रमांक-कु.स्वरा पाटील,कु.साक्षी सरवणकर,कु.दीक्षा सुथार, कु.लावण्या झोरे,
द्वितीय क्रमांक - कु.साक्षी तेली
तृतीय क्रमांक -कु.भार्गवी खानविलकर
19 वर्षाखालील मुलींच्या गटात-
प्रथम क्रमांक-कु.सावनी शेट्ये ,कु.दुर्वा पाटील, कु.नंदिता मत्तलवार,कु.मंथली मुणगेकर,
द्वितीय -कु.सावरी ब्रह्मदंडे,
कु.अक्षता कोकरे, कु.रूपाली कोकरे
तृतीय -कु.रिद्धी परब,कु.अनुष्का जाधव,
मुलांच्या गटातून-
14 वर्षाखालील मुलांच्या गटात-
द्वितीय क्रमांक -ध्रुव शेट्ये, अश्मेस लवेकर,
तृतीय क्रमांक -भावेश नारकर
17 वर्षाखालील मुलांच्या गटात-
प्रथम क्रमांक -दुर्वास पवार,रूक्षराज घुगे,
विघ्नेश पेडणेकर,
द्वितीय क्रमांक -कैवल्य मुंडले,आर्यन राणम, अथर्व सावंत,
तृतीय क्रमांक -आराध्य राणे,अमोल जाधव,
सार्थक गुरव,सोहम पाटील,
19 वर्षाखालील मुलांच्या गटात-
प्रथम क्रमांक -हर्षल कदम, शुभम राठोड, विश्वास चव्हाण, दीपक जाधव,किशोर देवासी,
द्वितीय क्रमांक -यशराज नारकर
तृतीय क्रमांक -सनी मिसाळ
आदींनी घवघवीत यश संपादन केले आहे.
प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची नृसिंहवाडी ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक क्रीडा तथा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, प्रशिक्षक अभिजीत शेट्ये,रूपेश कानसे,राहुल शेट्ये,साईप्रसाद बिजितकर,देवेंद्र देवरुखकर,सोनु जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कुल कमिटीचे सर्व पदाधिकारी, पालक शिक्षक संघ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.बिसुरे बी.बी.,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा क्रीडाअधिकारी श्रीम.विद्या शिरस, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड,सचिन रणदिवे आदींनी अभिनंदन करुन कोल्हापूर विभागीय कराटे पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छ्या दिल्या आहेत.

