माजी सभापती राजु परुळेकर यांनी व्यक्त केली उत्स्फूर्त भावना
मालवण | प्रतिनिधी : निलेश राणे यांचा विजय म्हणजे मालवण कुडाळ मतदारसंघाच्या नव्या विकास युगाचा प्रारंभ आहे. गेल्या दहा वर्षातील विकासाचा दुष्काळ संपणार असून विकासाची गंगा येणार आहे. अशी उत्स्फूर्त भावना मालवण पंचायत समिती माजी उपसभापती राजु परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.
जनतेच्या हक्काचे आमदार म्हणून निलेश राणे राज्यात आदर्शवत असा मतदारसंघ निर्माण करतील. पदावर नसताना निधी खेचून आणण्याची क्षमता असलेले हे नेतृत्व आमदार म्ह्णून गतिमान विकास निश्चितच साध्य करणार. सोबत केंद्र सरकारच्या माध्यमातून खा. नारायण राणे साहेब निधी आणणार. त्यामुळे विकासाची गाडी सुसाट असणार आहे.
निलेश राणे यांच्या विजया नंतर गावागावात साजरा झालेला विजयी जल्लोष दिवाळी साजरी व्हावी असाच आहे. सोबतच निलेश राणे लवकरच मंत्री व्हावेत अशीही भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. अशाही भावना राजु परुळेकर यांनी व्यक्त करताना सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत.

आमदार निलेश राणे यांचा विजय कुडाळ मालवण मतदारसंघाच्या नव्या विकास युगाचा प्रारंभ!
