मालवण : आमदार नितेश राणे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शुभाशीर्वाद घेतले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही भगवी शाल देऊन आमदार नितेश राणे यांचे कणकवली विधानसभेतून मिळवलेल्या हॅट्रिक विजयाबद्दल अभिनंदन केले.

