निलेश राणे यांच्या विजया नंतर भाई मांजरेकर यांनी व्यक्त केली भावना
मालवण : निलेश नारायणराव राणे हे नाव पूर्ण भारतात परिचित आहे ते त्यांच्या कार्य कर्तृत्वाने. निलेश राणे हे पदवीधर ते सुध्दा विदेशात शिक्षण घेऊन भारतात आले, अतिशय कमी वयात भारताच्या लोकसभेत खासदार म्हणुन निवडणून आले. ५ वर्ष देशवासियांना आपल्या प्रेमळ स्वभावाने जिंकून घेतले, पण हया भोळया स्वभाला प्रत्येक राजकीय वळणावर दृष्ट लागतच होती. ह्या निस्वार्थी नेत्याचा दोन वेळा खासदारकीला राजकीय पेंचा मुळे पराभव झाला, पण हा राजबिंडा राणेचा वारसदार शांत कसा राहणार कारण समाजसेवा रक्तात भिनली होती.
राजकिय स्थित्यंतर बदलत होती २०१४ ला राज्याचे माजी मुख्यंमंत्री नारायण राणे साहेबांचा पराभव झाला. हा पराभव सर्वाच्या जिव्हारी लागला कार्यकर्ते तर आपल्या शरीरांचा अवयव तुटल्यागत निपचित झाले. पुन्हा २०१९ राजकीय स्थित्यंतर चुकले. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित युद्ध झाले. पुन्हा नाईक विजयी ठरले आता मात्र बैचनी वाढली. राणे साहेबांचा पराभव, काही ठिकाणी झालेला अविश्वास या सर्व गोष्टीचा अभ्यास करुन मनात चिड घेउन कुडाळ मालवण मतदार संघाची सर्व जबाबदारी घेऊन मैदानात उतरले ते निलेश राणे. लढणार आणि जिंकणार, त्यातच २०२४ ची खासदारकी आली योग जुळला कमळ पवित्र चिन्ह मा. नारायण राणे साहेबांना मिळाले. राणे साहेबांनी ४५ वर्षानी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर कमळ फुलवले आणि इकडे कुडाळ मालवण मतदार संघावर जीव ओतुन निलेश राणे काम करत होतेच, पण निलेश राणेना राजकीय वळणारवर पुन्हा दृष्ट लागली तरी पण न डगमगता निलेश राणे सरसावले. नारायण राणेंनी १९९० मध्ये बाळासाहेब ठाकरेचा आर्शिवाद घेउन प्रभुरामचंद्राची धन्युष्य बाण घेऊन विधानसभा प्रवेश केला तोच योग निलेश राणे साहेबांना आला.
वडीलाच्या 2014 च्या पराभवांचा वचपा घ्यायचा, ह्या इर्षेने पेटून उठलेल्या निलेश राणे साहेबांना अनाथांचा एकनाथ राजकीय वळणावर धन्युष्य बाण घेऊन भेटला. अवघ्या २० दिवसात निलेश राणे शिवसेना धन्युष्य बाण घेऊन कुडाळ मालवण मध्ये भिडले आणि जिंकले. सोबत होती दत्ता तिथे सत्ता अनेक दिग्गज विरोधात गेले होते सोबत होती ती १९९० पासुन राणे परिवारावर प्रेम करणारी जनता. नाईकांचा विषारी प्रचार चालू होता निलेश राणे शांत होते, जनतेशी संवाद ठेवून विकासाचे व्हिजन निश्चित करत होते. कारण होते १० वर्षाच्या त्या पराभवाला पुसण्याचा, भस्मासुर दहन करणार म्हणणारे उबाठा चे ठाकरे कुंटूब, ज्यांना स्वःताचा संसार सांभाळता न आला ती हिंन्दू देवताचा अपमान करणारी सुषमा अंधारे, राणे विरोधक सर्व शक्ती एकवटली. तरी सुध्दा निलेश राणे न डगमगता लढले आणि जिंकले कारण जनता सुज्ञ आहे. शिवरायांची ही पुण्य भुमी आहे. ह्या भुमीत नाईक आणि ठाकरे कंपनीने महाराजांचा अपमान केला. त्याचा बदला शिवप्रेमीनी घेतला. न भुतो न भविष्य असा विजय प्राप्त झाला आणि पुन्हा राणे सरकार आले. बाप से बेटा सवाई पूर्वी बेटा खासदार होता बाप आमदार होते. आता बाप खासदार बेटे आमदार, हयाला म्हणतात राणे पॉवर, याचा अर्थ पुत्र व्हावा ऐैसा त्याचा त्रिखंडात डंका. अश्या भावना भाई मांजरेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

