Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कुडाळ- मालवण मधून निलेश राणे ८ हजार १७६ मतांनी विजयी

कुडाळ- मालवण मधून निलेश राणे ८ हजार १७६ मतांनी विजयी

आमदार वैभव नाईक यांचा केला पराभव

अवघ्या राज्यात ठरली लक्षवेधी लढत

निलेश जोशी  | कुडाळ : विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निलेश नारायणराव राणे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांचा ८ हजार १७६ मतांनी पराभव केला. निलेश राणे याना ८१ हजार ६५९ तर वैभव नाईक यांना ७३ हजार ४८३ मते मिळाली. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार अनंतरज नंदकिशोर पाटकर याना तिसऱ्या क्रमांकाची १ हजार २५८ मते मिळाली. तर नोटा १०७८ मते मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिला.


महाराष्ट्र विधासभेसाठी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तहसील कार्यालयात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी योग्य नियोजनासोबतच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी कक्षात कोणालाच मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती. सकाळी बरोब्बर ८ वाजता टपाली मतांची मतमोजणी सुरु झाली. त्यांनतर ८.३० वाजता मतदान यंत्रांची मतमोजणी सुरु झाली. त्यासाठी १४ टेबल मांडण्यात आली होती. २० फेऱ्यांमधून हि मतमोजणी झाली. सुरुवातीला मालवण तालुक्यातील मतमोजणी झाली. आणि साधारण नवव्या फेरीनंतर कुडाळ तालुक्याची मतमोजणी करण्यात आली.


पहिल्या फेरीतच महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्यावर २१४ मतांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत वैभव नाईक यांनी मुसंडी मारत आघाडी घेतली. तिसऱ्या फेरी अखेर वैभव नाईक यांना १३९ मतांची आघाडी होती. पण त्यांनतर मात्र प्रत्येक फेरी गणिक निलेश राणे यांची आघाडी वाढतच गेली. थेट अगदी १६ व्या फेरीअखेर पर्यंत निलेश राणे यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. फक्त १७ व्य फेरीत वैभव नाईक यांनी आघाडी घेतली. पुन्हा पुढच्या तीनही फेऱ्यात निलेश राणे आघाडीवर राहिले. मतदान यंत्राच्या २० फेऱ्या संपल्या तेव्हा निलेश राणे यांनी ८ हजार ३४४ मतांची आघाडी घेतली होती.

टपाली मतदानमध्ये वैभव नाईक यांना आघाडी

एकूण १ हजार ६७१ टपाली मतांमध्ये वैभव नाईक यांना ८३० तर निलेश राणे याना ६६२ मते मिळाली. टपाली मतदानामध्ये वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावर १६८ मतांची आघाडी घेतली. टपाली मतांमध्ये इतर उमेदवार बसपाचे रवींद्र कसालकर यांना ५, अनंतरज पाटकर यांना ५, उज्वला येळावीकर यांना २ मते मिळाली. तर नोटाला २० मते मिळाली. एकूण १६७१ पैकी १५२४ मते वैध ठरली तर १४७ मते अवैध ठरली.

मतमोजणीच्या टपाली मते आणि मतदान यंत्राद्वारेच्या २० फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी अंतिम निकाल जाहीर केला. त्यानुसार रवींद्र कसालकर यांना ७३२ मते, वैभव नाईक याना ७३ हजार ४८३ मते, निलेश राणे यांना ८१ हजार ६५९ मते, अनंतरज पाटकर याना १२६३ मते, उज्वला येळवीकार याना ६३२ मते मिळाली. नोटाच्या खात्यात १ हजार ७८ मते राहिली. निकाल जाहीर केल्यानंतर ऐश्वर्या काळूशे यांनी विजयी उमेदवार निलेश नारायणराव रावे यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

निलेश राणे आणि वैभव नाईक यांची उपस्थिती

मतमोजणी सुरु असताना सकाळी ८.१५ वाजता निलेश राणे यांचे मतमोजणीच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांनतर ११ वाजता आमदार वैभव नाईक मतमोजणी केंद्रात आले. त्यांनतर वेळाने निलेश राणे निघून गेले. साधारण १५ व्या फेरीनंतर आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने आमदार वैभव नाईक यांनी मतमोजणी केंद्रातून एक्झिट घेतली. जाण्यापूर्वी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आणि विजयी उमेदवार निलेश राणे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मतमोजणी वेळी सर्वच उमेदवार उपस्थित होते.

rapan bottom