Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

उद्या सकाळी आठ वाजता होणार मतमोजणी

उद्या सकाळी आठ वाजता होणार मतमोजणी

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जिल्हाधिकारी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. तिनही विधानसभेतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील मतमोजणी केंद्रांची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, जगदीश कातकर, हेमंद निकम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिक्षांत देशपांडे, विरसिंग वसावे आणि श्रीधर पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी सूचना देतांना सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या आराखडाप्रमाणे मतमोजणी टेबल व्यवस्था, तसेच निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठकीची व्यवस्था करावी. मतमोजणी कक्षात अखंडीत विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याप्रमाणे नियोजन करावे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधींची बैठकीची व्यवस्था करावी. आवश्यक तेथे लाऊडस्पिकर बसविण्यात यावेत. मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, निवडणूक निरीक्षकांची बैठक व्यवस्था, विविध सोयी- सुविधांची उभारणी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीसांना पुरवायच्या सुविधा, पोलीस सुरक्षा, वाहनतळाची जागा निश्चिती, वाहतूक वळविणे, कायदा व व्यवस्थेबाबत माहिती घेतली.

या ठिकाणी होणार मतमोजणी
कणकवली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी HPCL हॉल, तळमजला, कणकवली कॉलेज , कणकवली, कुडाळ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी तहसिल कार्यालय, कुडाळ, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी तहसिल कार्यालय, सावंतवाडी येथे होणार आहे

तिनही मतमोजणीसाठी निरीक्षकांची नियुक्ती
विधानसभेच्या मतमोजणीसाठी तिनही विधानसभा मतदारसंघानिहाय भारत निवडणूक आयोगाने केंद्रीय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यात कणकवलीसाठी परवीनकुमार थिंद, कुडाळसाठी पुष्पराज सिंह आणि सावंतवाडीसाठी प्रशांत आर. यांची नियुक्ती केली आहे. यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

अशी असेल मतमोजणीची व्यवस्था
मतमोजणीच्या सुरूवातीस सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांची व ईटीबीपीएसची मोजणी सुरु होणार आहे. त्यानंतर ८.३० वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणीची माहिती खालीलप्रमाणे
कणकवली- फेरी 24,टेबल 14, कर्मचारी संख्या 250, कुडाळ -फेरी 20 टेबल, टेबल 14, कर्मचारी संख्या 260 , सावंतवाडी- फेरी 23, टेबल 20, कर्मचारी संख्या 200, मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी
मतमोजणी केंद्राशेजारी माध्यम प्रतिनिधींसाठी मिडीया कक्ष तर उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी कम्युनिकेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. मिडीया कक्षात भारत निवडणूक आयोगामार्फत पासेस देण्यात आलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहेत. मतमोजणी केंद्रांत मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रात कोणीही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत.

https://skynewstoday.in/?p=6942

rapan bottom