Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मतमोजणीसाठी कुडाळ-मालवणचे प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी कुडाळ-मालवणचे प्रशासन सज्ज

काउंटिंग सुपरवायझर पुष्कराज सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणी

निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या  काळूशे यांची माहिती

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी महसूल व पोलीस प्रशासन सज्ज झाले झाले असून १४ टेबलांवर २० फेऱ्यामध्ये  मध्ये सर्व २७९ केंद्रांची मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.उत्तर प्रदेश वरिष्ठ अधिकारी काउंटिंग सुपरवायझर पुष्कराज सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या  काळुसे यांनी दिली.
शनिवारी पहाटे ४ वाजल्यापसूच मतमोजणी संबंधीच्या कामांना सुरुवात होणार आहे. पहाटे ५ ते६ वा. या वेळेत मतमोजणी करिता असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टेबल निश्चित करून दिले जातील.काउंटिंग स्टॉप, काउंटिंग सुपरवायझर,काउंटिंग असिस्टंट, मायक्रो ऑब्जर्वर असे प्रत्येक टेबलवर नियुक्त करण्यात आले आहे. ईव्हीएमची काउंटिंग करण्यासाठी साधारणतः १४ टेबल निश्चित करण्यात आली आहेत ‌२० फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे. पोस्टल बॅलेट आणि ईटीपीबीएससाठी (सैनिक मतदार मतपत्रिका) एकूण ५ अधिक १ अशी ६ टेबलांची रचना केली आहे.अशी १४ टेबलं आणि पोस्टल बॅलेटची ६ टेबल मिळून २१ टेबलावर काउंटिंग सुपरवायझर, पोस्टल बॅलेटसाठी प्रत्येक दोन-दोन असिस्टंट आहेत. प्रत्येक टेबलवर मायक्रो ऑबझर्व्हर उपस्थित राहणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सिक्युरिटी अरेंजमेंटसाठी पोलीस विभाग ही सज्ज आहे. साधारणता २५० पोलीस फोर्स मतमोजणीच्या सभोवताली सज्ज राहणार आहे.त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे पोलीस कार्यरत राहणार आहेत. दोन प्रमुख उमेदवारांच्या गटांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर विरुद्ध दिशेला जागा निश्चित करून ठेवण्यात आली आहे. जेणेकरून दोन्ही गटात वाद होणार नाही, याची सुद्धा पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.जे काउंटिंग प्रतिनिधी आहेत त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी सुद्धा जागा निश्चित केली आहे. कोणत्याही परिस्थितीत जमाव जमणार नाही, गर्दी होणार नाही, त्या दृष्टीने पोलीस यंत्रणे दक्ष रहावे याबाबत आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांसाठी सुद्धा स्वतंत्र कक्ष सज्ज ठेवण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती काळूशे यांनी दिली.

https://skynewstoday.in/?p=6942

rapan bottom