Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कुडाळ मतदारसंघ मतमोजणीसाठी १४ टेबल आणि २० फेऱ्या

कुडाळ मतदारसंघ मतमोजणीसाठी १४ टेबल आणि २० फेऱ्या

दुपारी १२ पर्यंत निकाल होणार स्पष्ट

पक्ष कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी जागा निश्चित

निलेश जोशी / कुडाळ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय येथे होणार आहे. सकाळी आठ वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे त्यासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
१४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण २० फेऱ्या होणार आहेत. त्यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ रोजी सकाळी आठ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी १२ पर्यंत कुडाळ-मालवण मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तीन टप्प्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.
प्रशासन स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राजकीय स्तरावर विविध लोकप्रतिनिधी मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत तर प्रशासन मात्र निवडणुकीची मतमोजणी आणि निकालाची जय्यत तयारी करण्यात व्यस्त आहे. या अनुषंगाने कुडाळ तहसील कार्यालय येथे मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे.
कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण २७९ मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे एका फेरीत १४ केंद्राची मतमोजणी होणार आहे. एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे. या मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी हॉटेल अभिमन्यू जवळचा परिसर व एस एन देसाई चौक या ठिकाणचा परिसर अशा दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. जागा लवकरच त्या त्या पक्षाच्या नेत्यांना सांगण्यात येतील अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

rapan bottom