मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ महविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनी मतदारांसह सर्वांचेच आभार मानले आहेत.
विधानसभा निवडणुक कुडाळ मालवण मतदार संघातून सर्व मायबाप जनतेने आपला मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क बजावला, त्यासाठी आपले खूप खूप आभार. महाराष्ट्र व देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे येऊन मतदान केले, ही कौतुकास्पद बाब आहे. सर्व नेत्याचे, कार्यकर्त्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार सोशल मीडिया द्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनी व्यक्त केले आहेत.

