मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मतदारांसह सर्वांचेच आभार मानले आहेत.
कुडाळ-मालवण विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीचा आदर करत सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडले. याबद्दल सर्व मतदार बंधू व भगिनी यांचे मनःपूर्वक आभार.
त्याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबवणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे व पोलिस प्रशासनाचेही शतशः आभार. तसेच माझ्या प्रचारासाठी रात्रंदिवस अविरतपणे कार्यरत राहिलेले सर्व नेते, पदाधिकारी, सहकारी, पाठिंबा देणाऱ्या विविध संघटना व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासह सर्वांचे मनःपूर्वक आभार.
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मानले आहेत.

