Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

"मारिया आल्मेडाची" सुवर्णपदकाला गवसणी"

"मारिया आल्मेडाची" सुवर्णपदकाला गवसणी"

एशियन थायबॉक्सिंग गेम्स

सिंधुदुर्ग : नुकत्याच गोवा येथे झालेल्या एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी सिंधुदुर्गची आणि वेंगुर्ला तालुक्यातील खेळाडू मारिया आल्मेडा हिने महिलांच्या खुल्या गटामध्ये आपल्याच देशाची खेळाडू भावना निषाद हिला पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

तसेच जिल्ह्यातील हेरंब नार्वेकर व संस्कार राणे या दोघांनीही वैयक्तिक रौप्य पदके पटकवत भारतीय संघाची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली.

या स्पर्धेत सुवर्णपद पटकावणारी मारीया आल्मेडा ही वेंगुर्ल्याची असून योगासन स्पोर्ट्स मध्ये राष्ट्रीय खेळाडू आहे त्याचबरोबर ती एक उत्कृष्ट योगा प्रशिक्षक आहे मार्शल आर्ट्स व बॉक्सिंग या क्षेत्रामध्ये येऊन महिलांना स्वसंरक्षण व आत्मनिर्भर बनवण्यासाठी तिला काम करायचे आहे

या स्पर्धेत रोप्य पदक मिळवणारा हेरंब नार्वेकर हा ओरोस शाळा नंबर 01 चा विद्यार्थी असून संस्कार राणे हा कणकवली येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक चित्राक्षा मुळये व मृणाल मलये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या एशियन स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये यजमान भारतासह. नेपाळ.कंबोडिया, भूतान,श्रीलंका, व्हिएतनाम अन्य काही देश सहभागी झाले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे व संस्थेचे विश्वस्त गौरव घोगले यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

rapan bottom