Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार : मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार : मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना शाश्वत रोजगार व पर्यटन विकासाला चालना, ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करणारा आणि सोबत हिंदुत्वाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास सहकार्य करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांनाच रोजगार आणि विकासा सोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व वक्फ बोर्ड जमिन सारख्या विषयांना बळ देणे यासारख्या मागण्या मान्य करून त्यांना समर्थन देणाऱ्यांना मनसेचा कायम विरोधच असणार आहे. आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना शाश्वत रोजगार व पर्यटन विकासाला चालना, ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करणारा आणि सोबत हिंदुत्वाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास सहकार्य करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.

rapan bottom