आचरा : आचरा वरचीवाडी येथील रहिवाशी, इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानाचे माजी ट्रस्टी व देवस्थान मानकरी सदाशिव उर्फ बबन रामकृष्ण मिराशी (वय 75) यांचे रविवारी रात्री निधन झाले. आचरा देवस्थान ट्रस्टी म्हणून दीर्घाकाळ कामकाज पहिले. मनमिळाऊ लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आचरा येथील महादेव मिराशी यांचे वडील व आचरा गावचे उपसरपंच संतोष मिराशी यांचे काका होत.

सदाशिव उर्फ बबन मिराशी यांचे निधन
